Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि.३१ जानेवारी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी

0

पिंपरी,दि.२९ जानेवारी २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-पिंपरी चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार दि. ३१.१.२०२१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेमध्ये ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार दि.३१.१.२०२१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन मा. आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर व मा. महापौर सौ. उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे. मनपा परिसरात १०१९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 55 वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २१५ पर्यंवेक्षक व ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, मनपा शिक्षक व उपशिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने।रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९०८ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७३ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. तरी आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे, पालकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर व मास्कचा वापरण्याची खबरदारी घ्यावी,पोलिओ लस घेण टाळु नका असे महापौर व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे वतीने नागरिकांना विनीत आवाहन करण्यात आले.

Previous articleदेशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्म पुरस्कार 2021 जाहीर
Next articleग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + sixteen =