भोसरी,दि.14 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावर्षी होणारी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’पिंपरी-चिंचवडम धील कोरोना योद्धयांना समर्पित करण्यात आली आहे, अशी घोषणा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने रविवार, दि.17 जानेवारी 2021रोजी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्वात मोठी सायकल रॅली पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या रॅलीमध्ये सुमारे 5 हजार सायकलस्वार सहभागी होत असतात. यावर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे रॅलीचे नियोजन पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करीत येत्या 17 जानेवारीला भोसरीतील गावजत्रा मैदानावर (कै. अंकुशराव लांडगे सभागृह शेजारी) सकाळी ६ वाजता रॅलीला सुरूवात होईल. 10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्पयांमध्ये ही रॅली होणार आहे.अशी माहिती पञकार परिषदे मध्ये आमदार महेश लांडगे यांनी दिली,या वेळी इंजि.सतीश इंगळे,श्रीकांत सवणे,चेअरमन संतोष लोढें नितीन काळजे,सचिन भैय्या लांडगे,कार्तीक लांडगे,राहुलदादा जाधव आदी.पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन करा नोंदणी… PCMCSmartSarathi अॅपमध्ये नोंदणी करा.
●Play store – https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
●App Store – https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS
किंवा पुढील लिंक वर क्लिक करून नोंदणी करता येईल. http://bit.ly/RIVERCYCLOTHON