Home ताज्या बातम्या पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चे मा. महापौरांच्या हस्ते उद्घाटन

पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चे मा. महापौरांच्या हस्ते उद्घाटन

0

पिंपरी,दि. १२ जानेवारी २०२१ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चे मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. तसेच ग्राहकदेखील वस्तूंची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पर्यायाचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या धोरणाला अनुसरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहराच्या विकासाला चालना मिळावी आणि व्यापारी व ग्राहक यांच्या दरम्यान दुवा साधला जावा यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथीमध्ये ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध होऊन सवलतींचा लाभ मिळेल तसेच व्यापारी बांधवांनादेखील व्यवसायवृद्धीसाठी याचा उपयोग होईल.

कोरोनाकाळात पीसीएमसी स्मार्ट सारथी घरोघरी पोहोचला आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी सुविधा विविध भाषांमध्ये उपलब्ध करण्यात यावी. शहरातील सर्व स्तरांमधील व्यापाऱ्यांना पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. तसेच नागरिकांनी आपल्या भागातील व्यवसायिकांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)च्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे (मा. संचालक पीसीएससीएल), मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके(मा. संचालक पीसीएससीएल), मा. विरोधी पक्षनेते शरद मिसाळ(मा. संचालक पीसीएससीएल), मनसे गटनेते मा. सचिन चिखले(मा. संचालक पीसीएससीएल), मा. आयुक्त श्रावण हर्डीकर(मा. संचालक पीसीएससीएल), मा. निळकंठ पोमण (सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, पीसीएससीएल), अधिकारी, कर्मचारी व व्यापारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होणारे विविध कार्यक्रम, तसेच सुरू असणाऱ्या विविध सवलत योजना यांची माहिती पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या मर्चंट मोड्युलमध्ये नोंदणी केल्यामुळे व्यापारी बांधवांना विविध लाभ मिळतील. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत अॅप्लीकेशन आणि वेब पोर्टलवर जाहिरात करण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी होईल. व्यापाऱ्यांना पिंपरी-चिंचवडमधील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येईल. अॅपमुळे व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या योजना ग्राहकांपर्यंत तात्काळ पोहोचतील. ग्राहकांच्या नेमक्या गरजा काय आहेत याची माहिती व्यापारी बांधवांना मिळेल. ही सुविधा पीसीएमसी स्मार्ट सिटी मार्फत राबविली जात असल्यामुळे यात नागरिक आणि व्यवसायिक यांच्या डेटा सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. असे मत मा. आयुक्त श्रावण हर्डीकर व्यक्त केले.
सुरुवातीला ही सुविधा नि:शुल्क उपलब्ध असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. प्रारंभिक टप्प्यामध्ये सदर सुविधा QR कोड स्कॅन तत्त्वावर सुरु करण्यात येत आहेत. आजपर्यंत सव्वालाख नागरिकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाउनलोड करण्यात आले असून मर्चंट मोड्यूलमध्ये १०२ व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ हे मोबाईल अॅप डाउनलोड करण्याचे तसेच ई-कॉमर्स प्रणाली (मर्चंट मोड्युल) या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच विविध सेवा-सुविधांचा आणि सवलतींचा लाभ घेण्यासाठी आजच डाउनलोड करा पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप-
●Play store – https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
●App Store – https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS

 

Previous articleधनजंय मुंडेची प्रतिक्रिया सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे
Next articleश्रेयवाद-सत्ताधारी भाजपालातर घाईच होती,माञ अजितदांदाना राजशिष्टाचारा प्रमाणे बोलवले असते तर पंतप्रधान अवास योजनेची सोडत झाली असती का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + 9 =