Home ताज्या बातम्या श्रेयवाद-सत्ताधारी भाजपालातर घाईच होती,माञ अजितदांदाना राजशिष्टाचारा प्रमाणे बोलवले असते तर पंतप्रधान अवास...

श्रेयवाद-सत्ताधारी भाजपालातर घाईच होती,माञ अजितदांदाना राजशिष्टाचारा प्रमाणे बोलवले असते तर पंतप्रधान अवास योजनेची सोडत झाली असती का ?

49
0

पिंपरी,दि.13 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महानगर पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची आॅनलाईन सोडत 11 जानेवारी 2021 रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र, पाटील यांच पिंपरी-चिंचवड शहरासाठी योगदान काय आहे असा प्रश्न उपस्थित करत आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले नसल्याने निदर्शने करत या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध केला. सोडत असलेल्या नाट्यगृहाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली.म्हत्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी ही कार्यक्रमास उपस्थित नव्हते,सोडतही अचानक रद्द केली, ऐन कार्यक्रमाची वेळ सुरु होऊन बराच कालावधी उलटल्या नंतर सोडत रद्द झाल्याचे स्पष्ट केले.मोठया संख्येने नागरीक उपस्थित असल्याने गोधंळ उडाला.समन्वय व्यवस्थित न साधल्याने सत्ताधारी व प्रशासनाला सोडत रद्द करावी लागली.त्यामुळे भाजप सत्ताधारी आक्रमक झाले व पालिका प्रशासनाच्या विरोधात आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्या केबिनच्या दारासमोरच येऊन निदर्शन करण्यास बसले, राष्ट्रवादी पक्षाने श्रेय लाटण्यासाठी खटाटोप केला असल्याचा आरोप भाजपाने केलाय,तर राष्र्टवादीने भाजपावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत अरोप केले आहेत या सर्वांमध्ये मात्र सर्वसामान्य नागरिकांच कुणाला काही घेण देण नाही.पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगर पालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून त्याची सोडत  चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटयगृह येथे होणार होती. 48 हजार नागरिकांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरले. त्याची सोडत असल्याने नाट्यगृह येथे हजारो नागरिक उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे जनतेचा हिरमोड झाला असून दोन्ही पक्षांनी जनतेची दिशाभुल केले असल्याचं सर्वसामान्य नागरिकांनी म्हटलं आहे.सकाळ पासुन नागरिक नाट्यगृहात ठाण मांडून होते.एकदंरीत या प्रकारामुळे जनता निराश झाली.आयुक्त पुण्यातील मिटींग मुळे पालिकेत उपस्थित नसल्यामुळे व पञकार परिषद ला उपस्थित नसल्याने समन्वय व्यवस्थित झाला नाही व पञिका छापल्याप्रमाणे व पालकमंञ्याना राजशिष्टाचारा प्रमाणे बोलवले नसल्याने प्रशासनाकडुन कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले,व लवकरच कार्यक्रम रितसर घेण्यात येईल प्रशासन चार वाजे पर्यंत पालकमंञ्याना बोलवण्याच्या प्रयन्तात होते असे उत्तर पञकारांना आयुक्तांनी दिले.माञ सत्ताधारी भाजपा हि आक्रमक होती,आयुक्तांनी सत्ताधार्‍याची माफी मागितल्यांने व दोषींन वर कारवाई करतो म्हटल्याने भाजपाने निदर्शने मागे घेतले.यावेळी महापोर माई ढोरे,नगरसेविका सीमा सावळे,पक्षनेते नामदेव ढाके,सभापती संतोष लोंढे,एकनाथ पवार आदी भाजपा नगरसेवक उपस्थित होते,तर राष्र्टवादी ने माञ कार्यक्रम रद्द करण्यास यशस्वी झाल्याचे बोलत दंड थोपटले.पण यामुळे जनतेचे काय? भाजपाचे सर्व नगरसेवक, महापोर व आमदार यांनी घाई केल्याचे दिसुन आले.प्रथम दर्शी काम 20% झाले असुन रावेत सदनिके वर कोर्ट स्टे असल्याने तेथीलही काम बंद आहे.संतोष मधुकर भोंडवे यांनी महाराष्र्ट शासन व सदनिका स्ंस्था यांच्या विरुद्ध कोर्टात धाव घेत स्टे घेतला आहे.मग जर असे असतानाही सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाला पंतप्रधान आवास योजनेच्या सोडत करण्याची घाई का? श्रेयलाटण्यासाठीच ना,सोडत रद्द झाल्याने सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी गोधंळ घालत निदर्शना ऐवजी महापौर दालनात तातडीची बैठक घेऊन ठराव करत दोषींवर कारवाही करन अपेक्षित होते व लवकरच सोडत घेण्यात यावी याचा ठराव पास करायला हवा होता पण जनतेचे काय? जनते पेक्षा श्रेय कसे मिळेल या कडे दोन्ही पक्ष लागले आहे,तर उलट पक्षी राष्र्टवादीने विरोधी पक्षाच्या केबिन मध्ये दोन दिवस पञकार परिषद घेतली व भाजपा भ्रष्टाचारी कसा ह्या कडे लक्ष वेधले,भाजपा व पालिका प्रशासनाने उपमुख्यमंञी व पुणे जिल्हाचे पालकमंञी अजितदादा पवार यांना राजशिष्टाचारा प्रमाणे रितसर का बोलवले नाही म्हणुन शहरातील राष्र्टवादी आक्रमक झाली, व पञकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते राजु मिसाळ राष्र्टवादीचे पिं.चि शहरध्यक्ष संजोग वाघेरे,नगरसेवक प्रशांत शितोळे म्हटले की कष्टकरी गोरगरीबांना घर निश्चित मिळाले पाहिजे पण त्यांचा जीव टांगणीला कशाला? रावेत ला कोर्टचा स्टे आहे त्यात ड्राॅचा नंबर लागला तर घर कधी देणार याचा कालावधी सत्ताधारी देणार का? असा सवाल उपल्बध केला,5000रु प्रमाणे मनपा कडे एकुण 20 कोटी जमा झालेत ते घर न मिळणार्‍यानां व्याजासह परत देतील का ? राष्र्टवादीच्या काळात साडेतीन लाखात घरे दिली.तीच घर भाजपा आठलाखात देत आहे.असा सवाल करत सत्ताधारी व भाजपा आमदारांनवर राष्र्टवादीचे शहरध्यक्ष विरोधी पक्षनेते व एका नगरसेवकांने तोडंसुख घेतले खरे पण जनतेचे काय? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.राष्र्टवादीचे विरोधी पक्षनेते व शहरध्यक्ष यांच्या उपस्थितीत नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले आम्ही सर्व काही अजितदादांसाठी केल? म्हणजेच जनतेचे दोन्हि पक्षाना घेण देण नाही,राष्र्टवादीने जसे शिष्टाचाराचा प्रश्न उपस्थित करत आम्ही साडेतीन लाखात घर दिली असे म्हणतात त्या प्रमाणे घराच्या किंमती आठलाखापेक्षा कमी करण्याचा प्रयन्त करताना कुठेही राष्र्टवादी दिसत नाही,जसे आॅनलाईन सोडतच्या दिवशी राष्र्टवादीने आक्रमक पविञा घेतला तसा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर नागरिंकाची फसवणुक होत आहे,उपस्थित राहु नका रावेत ला स्टे आहे अशी जनजागृती पञका व्दारे किवा पञकार परिषद घेऊन का नाही केली.म्हणजेच राष्र्टवादीला ही श्रेयाच पडले आहे.विकलांग गरीब जनता सोडत साठी उपस्थित होती.कोरोना पार्श्वभुमीवर कोणतीच उपाय योजना नव्हती,कोरोना पाॅझिटिव्ह पेशंट वाढल्यास जबाबदार कोण,घर लवकर न मिळ्यास जबाबदारी भाजपाने घेतली असती का? एंकदरीत सर्व प्रकारा वरुन असा प्रश्न उपस्थित होतो की अजित दादांना रितसर बोलवले असते तर पंतप्रधान आवास योजनेची सोडत झाली असती का? अजितदादा आले असते तर सर्व प्रकार लक्षात घेता सोडत रद्द केली असती का? या सर्व श्रेयवादा मुळे पुण्या प्रमाणे पिंपरी चिंचवडला ही भाजपा विरुद्ध राष्र्टवादीत जुंपली.श्रेय कोणी घेवो माञ गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे असा अवाज दबकत का होईना जनतेतुन येत आहे.याचा परिणाम वर्षभरानंतर येणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीत दिसुन येईल.

Previous articleपीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चे मा. महापौरांच्या हस्ते उद्घाटन
Next articleकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंचे संरक्षण कमी केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष पिंपरी चिंचवड शहरात आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − three =