Home ताज्या बातम्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र-डॉ. भारती...

खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र-डॉ. भारती चव्हाण

87
0

पिंपरी,दि.03 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र बहुविध संस्कृतीने नटलेल्या भारत देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे. या खंडप्राय भारत देशात महाराष्ट्र हे राज्य उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सहकार, कृषी अशा क्षेत्रांबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक स्वातंत्र्याबाबत देखील नेहमी अग्रेसर राहिला आहे. यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात समाज सुधारकांचे, साहित्यिकांचे, राजकीय पुढा-यांचे उल्लेखणिय कार्य आहे. यामध्ये महाराष्ट्राचे दुरदृष्टीचे नेते ज्यांनी महिलांना राजकारण तसेच शिक्षणात आरक्षण आणि वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा दिला, ते राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ खासदार शरद पवार यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. याबद्दल महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर आहेच. खा. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात आरक्षण दिले. परंतू त्यांच्याच पक्षात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणा-या महाविकास आघाडी सरकार मध्ये महिलांना संरक्षण मिळाले का ? असा प्रश्न मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी खुल्या पत्राव्दारे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश पदाधिका-या विरुध्द नुकताच औरंगाबादमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. या नराधमाचा राज्यभरातील विविध महिला संघटनांनी, राजकीय पक्षांनी रस्त्यावर येऊन निषेध केला. पिडीतेला न्याय मिळावा व अत्याचा-यावर कडक कारवाई करावी, यासाठी निदर्शने करणा-या महिलांमध्ये आम्ही खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना शोधत होतो. औरंगाबाद येथील या घटनेतील आरोपी एनसीपीचा पदाधिकारी नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. औरंगाबाद हे पुण्यापासून दूर आहे. त्यामुळे कदाचित खा. सुळे आणि चाकणकर यांना घटनेबाबत माहिती मिळण्यास विलंब झाला असे तुर्त ग्राह्य धरुया. शुक्रवारी पहाटे (दि. 1 जानेवारी 2021) पुण्यात खराडी येथे कामावरुन घरी जाणा-या युवतीचे अपहरण करुन काही नराधमांनी तीच्यावर बलात्कार केला. राज्याची राजधानी मुंबई येथे नविन वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवतीवर अत्याचार करण्यात आला. या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणा-या आहेत. त्याचा निषेध आम्ही मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करीत आहोत.
मात्र, इतर वेळी शुल्लक कारणांमुळे देखील माध्यमांपुढे येऊन प्रसिध्दी मिळविणा-या खा. सुळे आणि चाकणकर या घटनांचा गुन्हा दाखल झाल्यापासून दिसत नाहीत. त्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटनस्थळी गेल्या आहेत काय ? सोशल मिडीयाव्दारे देखील यांनी त्या नराधमांचा साधा निषेधही केला नाही. दहशतवाद्याला ज्याप्रमाणे जात धर्म नसतो. तो दहशतवादीच असतो. तसेच बलात्कार करणा-या अशा नराधमांना देखील भय आणि लज्जा नसते. असे नराधम कोणत्याही जाती धर्माचे किंवा पक्षाचे असले तरी समाजातील सुजाण नागरिकांनी विशेषता राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचा निषेध केला पाहिजे.
देशात महिलांसाठी पहिली शाळा महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात भिडे वाडा येथे सुरु केली. देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत खंबीरपणे पुढे येऊन महिलांसाठी शाळा सुरु ठेवली. फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा वारसा सांगणा-या खा. शरद पवार यांनी भले महिलांना राजकारणात आरक्षण दिले परंतू, महिलांना संरक्षण देण्याबाबत त्यांचा पक्ष कमी पडला आहे काय ? राजकीय क्षेत्रातील महिलांचे भक्षक हे पक्षातीलच पदाधिकारी असतात. असे राजकीय भक्षकच असहाय महिलांचे शोषण करतात. कौटुंबिक, सामाजिक अत्याचाराबरोबरच राजकारणातील छुपे अत्याचारांचे, राजकीय बलात्कारांचे प्रमाण देखील खुप आहे. त्याला कधीच वाचा फुटत नाही, असे ‘राजकीय बलात्कार’ आता थांबले पाहिजेत. त्यासाठी समस्त महिला भगिनींनी सर्व मतभेद, पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. अशा ‘राजकीय बलात्कार पिडीत’ महिलांनी देखील धैर्याने पुढे येऊन राजकीय प्रस्थापित शोषणकर्त्यांचा बुरखा फाडला पाहिजे. या पांढरपेशांचा खरा चेहरा आणि त्यांची दृष्कृत्य समाजापुढे आणली पाहिजे, अशी अपेक्षा खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून राज्यातील महिला करीत आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात अशा कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनेत आणि त्यातुनच घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक माध्यमांनी निदर्शनास आणून दिले आहे. तरी देखील खा. सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर आता शांत का आहेत ? असा प्रश्न आम्हा महिलांना पडला आहे. ‘दिशा’ कायद्या अंतर्गत तीस दिवसात या नराधमांना शिक्षा देण्याची आणि पिडीतांना न्याय मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता तुमच्यावर आहे. कायद्याने अशा उघडकीस येणा-या घटनांना काही काळ पायबंद बसेलही, पण कोणत्याही क्षेत्रातील महिलांवर पडद्याआडून होणारे अत्याचार थांबण्यासाठी आता खा. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. येणा-या नविन वर्षापासून पुढे राजकारणासह सर्वच क्षेत्रातील महिलांना युवतींना खुल्या आणि मुक्त वातावरणात अभिमानाने, स्वाभिमानाने जगण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करावा असे मानिनी फाऊंडेशच्या वतीने मी संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण आपणास करीत आहे.

Previous articleस्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे-महापौर उषा उर्फ माई ढोरे
Next articleखुल्या रंगमंचाची परवानगी मिळावी अन्यथा तमाशा कलाकारांचा आमरण उपोषणाचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − twelve =