Home ताज्या बातम्या स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान...

स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे-महापौर उषा उर्फ माई ढोरे

0

पिंपरी ,दि.३ जानेवारी २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-“स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे असुन सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली त्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, महापौर पदी विराजमान होवू शकली” असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १२ महिलांना महापौर माई ढोरे, उपमहापौर केशवजी घोळवे, व स्थायी समितीचे विद्यमान सभापती संतोष अण्णा लोंढे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व शारदामाई मुंढे प्रस्तुत “व्हय मी सावित्री बोलते” या एकपात्री प्रयोगाचे उद्धाटन आमदार महेशदादा लांडगे त्यांच्या हस्ते झाले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणारा “स्त्री शक्ती भुषण पुरस्कार २०२१ ” विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रेश्मा गायकवाड, रंजना धुमाळ, अॅड. प्रिती पंडीत, शनिता पवार, पिनल वानखेडे, डॉ. माधुरी शिंगाडे, अर्चना सावंत, सोनाली कुदळे, कविता जगताप, सुनिता इसकांडे, शिप्रा नानजकर, मिनाक्षी राळे यांचा समावेश आहे.मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसदस्या माधवी राजापुरे, सुवर्णा बुरुडे, आश्विनी जाधव, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, संतोष गोतावळे, शंकर लोंढे, महावीर जाधव आदी उपस्थित होते त्यावेळी महानगरपालिका प्रांगणात महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी पोर्टलचे उद्घाटन व रांगोळी काढणारे कलाकार विजय शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

पिंपरी चौक येथील महात्मा ज्योतीराव फुले पुतळा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या माधवी राजापुरे, सुवर्णा बुरुडे, आश्विनी जाधव, माजी नगरसदस्य मारुती भापकर, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, अॅड. उर्मिला काळभोर, सुरेखा बुरुडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रतापराव गुरव, अरुण बकाल, आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, देवेंद्र तायडे, गिरिश वाघमारे, नेहुल कुदळे, संतोष जोगदंड, हनुमंत घुगे, विलास गव्हाणे, हनमंत माळी, वैजनाथ शिरसाठ, काळुराम गायकवाड, अनिल साळुंखे, मारुती कदम, वैजनाथ माळी, संतोष जाधव, अशोक लोंढे, अमोल पल्हाडे, गुलाब पानपाटील, भारतराज मोरे, अमिन शेख सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या शिंदे, वंदना जाधव, सोनाली कुदळे, डॉ. वर्षा कुदळे, डॉ. ऐश्वर्या कुदळे, कविता खराडे, पुजा वायचळ, नंदा करे, वैशाली राऊत, सुनिता जमदाडे, मीरा कुदळे, सुषमा सोनवणे, विजया साठे आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात शारदाताई मुंढे यांनी “व्हय मी सावित्री बोलते” हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन गिरिष वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार मा. शिक्षण सभापती गिरिजा कुदळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावित्रीबाई फुले महिला व्यासपीठ, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी संघर्ष सेना, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ, पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नागरी हक्क सुरक्षा समिती यांनी देखील कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले.

Previous articleसावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्यात केले अभिवादन
Next articleखासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना मानिनी फाऊंडेशनचे खुले पत्र-डॉ. भारती चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + nineteen =