देहुरोड,२२ डिसेंबर २०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्धविहार या ठिकाणी धम्म दिक्षा घेण्याच्या २वर्षा पुर्वी २५ डिसेंबर १९५४ रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध मुर्तीची स्वहस्ते स्थापना केली.त्यामुळे या विहाराला ऐक ऐतिहासिक म्हत्व प्राप्त आहे,दरवर्षी लाखोंच्या सख्येने बौद्ध आनुयायी या ठिकाणी येतात.परंतु या वर्षी कोरोनांचा वाढता प्रादृर्भाव पाहता बुद्धविहाराचा ६६वा वर्धापन दिन घरुन साजरा करावा लागणार आहे.त्या संदर्भात देहुरोड पोलिस ठाणे येथे २२डिसेंबर २०२०रोजी पञकार परिषद घेण्यात आली.
सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात कोवीड- १९ संसर्गजन्य विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता मा.जिल्हाधिकार्यालय पुणे यांचेकडून ऐतिहासीक बुध्दविहार ६६ वर्धापन दिन मर्यादीत साजरा करण्याबाबत अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे.ब्रिटन मध्ये कोरोणा विधाणुचा नवा प्रकार आढळून आल्याने पार्श्वभुमीवर परदेशातुन येणा-या विमानसेवा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत.खबरदारीचा उपाय म्हणुन राज्यात तसेच महानगरपालीका क्षेत्रात रात्री ११.०० या ते सकाळी ६.०० वा पर्यंत संचार बंदी लागु केली आहे त्याप्रमाणे ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुध्दविहार येथील पुजा, धार्मीक विधी, वंदन कार्यकम हे कमीत कमी लोकांचे उपस्थीत करण्यात यावेत, धम्मभुमी या ठिकाणी जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी देण्यात यईल व सर्वाना ओळखपत्र देण्यात येईल तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून २५ डिसेंबर रोजी सेंट्रल
चौक ते निगठी भक्ती शक्ती दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून सेंट्रल चौक, मुकाईचौक, रावेत मार्गे निगडी अशी वाहतुक चालु ठेवण्यात येणार आहे.
बुद्धविहार परीसरात साहीत्य विक्री, पुस्तक स्टॉल, खेळणी, हातगाडया, मंडप स्टेज. अन्नछत्र कुठल्याही प्रकारची दुकाने लावण्यास परवानगी नाही देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे वैदयकीय सेवा, मोबाईल टॉयलेट, पाणी टॅंकर रुग्नवाहीका तसेच बॅरीकेटींग केले जाईल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मिडीयाव्दारे करण्यात येणार असून सर्वांनी घरात बसून दर्शन घ्यावे.तसेच दिनांक २५/१२/२०२० रोजी देहुरोड परीसर, चिंचोली, किन्हई, मामुर्डी या परीसरात जमावबंदी आदेश लागु करण्यात येणार असून नागरीकांनी घरात बसुन सहकार्य करावे अशी माहिती पञकार परिषदेत पोलिस उप.आयुक्त परिमंडळ-२ चे आनंद भोईटे यांनी पञकारांना दिली.व तसेच देहुरोड बुद्धविहार या ठिकाणी जाऊन स्वता २५डिसेंबर च्या अनुषंगाने पुर्व पाहणी केली,यावेळी देहुरोड विभागाचे सहा.पोलिस आयुक्त संजय नाईकपाटील,देहुरोड पोलिस ठाणेचे वरीष्ट पोलिस निरिक्षक-विलास सोंडे,ट्राफीकचे पोलिस उपनिरिक्षक-किशोर यादव,कॅन्टोन्मेटचे मुख्यअधिकारी रामस्वरुप हरितवाल उपस्थित होते.