Home ताज्या बातम्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून उमेदवार विजयी ; महाविकास आघाडीचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना...

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून उमेदवार विजयी ; महाविकास आघाडीचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करुन पिंपरीत जल्लोष साजरा

80
0

पिंपरी,दि.05डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र ताकद लावल्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. लोकांनी आम्हाला ज्या विश्वासाने मतदान केले, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी तिसर्यांदा विजयश्री खेचून आणून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.दि.04डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघामधून अरुण लाड, तर नागपूर पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी, शिक्षक मतदारसंघामधून प्रा.जयंत आसगांवकर या चारही उमेदवार विजयी झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले असुन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी यांनी पिंपरी चौकात जमत जल्लोष साजरा केला,संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन,ऐकमेकांना पेढे लाडु भरवत,फुगडी खेळुन फटाक्याच्या अतिषबाजी करत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.या वेळी राष्र्टवादीचे शहरध्यक्ष यांनी पञकारांशी संवाद साधला,ते म्हणाले मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि सरकारमधील सर्वांनीच मागच्या वर्षभरात जे काम केले त्याची ही पोचपावती आहे, मा. मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत जनतेने समाधान व्यक्त केल्याचे निकालातून दिसून येतेय,पदवीधर आणि शिक्षक संघटनांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, त्यावर आजपासूनच आम्ही काम सुरु करू आमची तिन्ही पक्षांची जबाबदारी आता वाढली आहे.महानगर पालिकेची ही निवडणुक बॅलट पेपर वर घ्यान्यात यावी म्हणजे भाजपाचा सापडासुप होईल.चंद्रकातदादा पाटील जसे म्हणतात की एकएकट लढुन दाखवा,तर मी महाआघाडीच्या वतीने म्हणेन की एकाच वेळी सगळी कडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा मग समजेल.भाजपाचे याॅकर चालला नाही तर महाआघाडीचे राॅकर चालले.सेना प्रमुख गजानन चिंचवडे यांनी सर्वाचे अभिनंदन केले व महानगर पालिकेवर ही महाआघाडीची सत्ता येईल असा विश्वास दाखवला,काॅग्रेसचे मयुर जैयस्वाल यांनी सर्व घटक पक्षाचे अभार व्यक्त करत आगामी निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास सर्व महाराष्र्टात महाआघाडीचा झेंडा फडकेल असे मत व्यक्त केले.यावेळी पिंपरी चिंचवड मधील महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुलभा उबाळे, सेना गटनेता राहुल कालाटे, पुणे जिल्हा सेना प्रमुख गजानन चिंचवडे, काँग्रेस युवक अध्यक्ष मयूर जैयस्वाल, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शमीम पठाण, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर,नगरसेविका प्रज्ञा खानोलकर,वर्षा जगताप,अर्चना राऊत,गंगाताई धेंडे, निलेश मुटके, माधव धनवे पाटील, नगरसेवक प्रशांत शितोळे, नगरसेवक मोरेशवर भोंडवे, गावडे, निलेश पांढरकर , माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक अनंत कोर्हाळे, मीना गटकळ , विजय लोखंडे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, किशोर गुरव, महेश झपके, रोमि संधू,युवराज दाखले,संदिपान झोंबाडे,पंकज कांबळे आदी. महाघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा प्रमाणात जल्लोष केला.

Previous articleआळंदी-नगराध्यक्षांच्या पतीची नगरपरिषदेच्या कामात ढवळाढवळ ; त्यावर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
Next article६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस; ओबीसी बांधवांना आत्मचिंतन करावयाचा दिवस !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − five =