Home ताज्या बातम्या मावळ- शेतात काम करत असताना 30 वर्षीय महिलेचा विनयभंग

मावळ- शेतात काम करत असताना 30 वर्षीय महिलेचा विनयभंग

0

कामशेत,दि.02 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ तालूक्यातील महिला अत्याचार वाढताना दिसत आहेत.अशीच एक घटना 30 नोव्हेंबर 2020 रोजी एक 30 वर्षीय महिला स्वतःच्या शेतावर काम करत असताना महिलेचा हात पकडुन मिठी मारून तिचा विनयभंग केल्याची घटना कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे.राऊतवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे कामशेत ते पवनानगर रोडच्या कडेला पिडित महिला शेताच्या बांधावर काम करत होत्या त्या वेळी आ आरोपी बाळू दत्तु कारके राहणार राऊतवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे याने विनयभंग केला असुन त्या विरोधात पिडित महिलेने 02 डिसेंबर 2020 रोजी फिर्याद दिली असुन.गु.र.नं 448/2020 भा.द.वि.क 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा तपास कामशेत पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांच्या कडे असुन पुढील अधिक तपास पोलिस करत आहेत

Previous articleकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आयुष डे केअर थेरपी केंद्रांना मंजुरी
Next articleवस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =