Home ताज्या बातम्या बौद्धाचार्य अमर चौरे यांनी केला खुलासा वायरल होणारे पञ केवळ सुडबुद्धिने माझी...

बौद्धाचार्य अमर चौरे यांनी केला खुलासा वायरल होणारे पञ केवळ सुडबुद्धिने माझी बदनामी करण्यासाठीच

146
0
Prajecha Vikas

कामशेत,दि.26 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र लग्नमंडपातून बौद्धाचार्य अमर चौरे यांनी नवरदेवाचा मोबाइल चोरला या अशा संदर्भात पत्र बहुजन समाज पार्टीचे खेड तालुका प्रभारी रमेश थोरात यांच्या बसपाच्या लेटर हेडवर सहीनिशी हे पत्र होत आहे वायरल या मागचं नक्की गुड काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट बौद्धाचार्य अमर चौरे यांची प्रजेचा विकासच्या संपादक विकास कडलक यांनी घेतली भेट. त्यावेळी अमर चौरे यांनी घडलेली स्थिती सांगितली 29 ऑक्टोबर 2020 रोजी चौरे यांना लोनावळ्यात लग्न लावून नंतर चाकण ला गेले वेगवेगळे कार्यक्रम असताना देखील दिलीप नाईकनवरे यांचा चौरेना फोन आला असल्याने थोरात आणि नाईकनवरे परिवाराच्या लग्नाला गेले मुलीच्या बाजूने अभंग बौद्धाचार्य हे आहेत तरी आपण वर पक्षाच्या बाजूने बौद्धाचार्य म्हणून यावे नाईकनवरे यांच्या म्हणण्यानुसार थोरात आणि नाईक नवरे या मंगल परिणयाला चौरे हजर झाले अमर चौरे यांनी काही दिवसापासून कार्यक्रम घेतले असल्याने दिनचर्या रोजची धावपळीत होती. ऑक्‍टोबर रोजी घाईगडबडीत हॅण्ड ग्लोज आणि टेबल वरचे सामान बॅगांमध्ये भरले आणि नेहमीप्रमाणे ते गाडीच्या डिकीत ठेवले आणि पुढील कार्यक्रमासाठी निघाले सदर कामशेत याठिकाणी मयत झाल्याने मयत कुटुबिंयाना सात्वनपर भेट देण्यासाठी गेले व सकाळी दुसर्‍या दिवशी नाईकनवरे यांचा फोन आला त्यांनी सांगितले की तुमच्याकडे माझ्या मुलाचा टेबलवरचा मोबाईल आला आहे का आला असल्यास आम्हाला कळवा चौरे नी सांगितले गाडीची डिकीत पाहतो जर मोबाईल असेल तर तुम्हाला फोन करतो तसे गाडीची डिकी खोलून पाहिले असता फळांच्या पिशवीमध्ये हॅण्डग्लोज सोबत मोबाईल आढळून आला. त्वरित नाईक नवरे ना फोन करुन चौरेनी सांगितले माझ्याकडे चुकीने मोबाईल आला आहे तरी आपण तो घ्यायला येऊ शकता का किंवा मी आपणास तो आणून देतो असे बोलणे झाल्याने सदर मोबाईल माझ्याजवळ असल्याकारणाने नाईकनवरे म्हटले तुमच्याजवळ मोबाईल आहे मला काळजी करण्याचे कारण नाही तुम्ही जेव्हा याल तेव्हा मोबाईल घेऊन या असे कळवले तरी मी मोबाईल घेऊन तिन चार दिवसानी गेलो असता नाईक नवरे यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल हरवल्याची तक्रार दिले असल्याने मी मोबाईल देताना पोलीस स्टेशन मधून माझ्याकडे चूक भुलीने मोबाईल आला आहे असे लेखी म्हणणे मांडून तो मोबाईल नाईकनवरे यांच्याकडे सुपूर्त केला व मोबाईल प्रकरण येथे संपले

सदर घटना कार्यक्रमाच्या गडबडीत घडली असून याचा फायदा घेत बहुजन समाज पार्टीचे खेड तालुक्याचे प्रभारी रमेश थोरात हे सूडबुद्धीने मला बदनाम करण्यासाठी त्यांच्या लेटरहेडवर स्वतःच्या सहीने अमर चौरे हे मोबाईल चोर आहे त्यांना कोणीही आपल्या घरातील विधीसाठी बोलवु नये चौरे न वर बहिष्कार टाका असे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करत असून त्यामुळे माझी मोठी बदनामी होत आहे व मला माझ्या परिवाराला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मी रमेश थोरात व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरोधात कायदेशीर मार्गाने त्यांना प्रतिउत्तर देणार आहे व त्यावर कायदेशीर मार्गाने ईलाज केला जाईल त्यामुळे अशा बिनबुडाच्या चाटाळ राजकीय पुढाऱ्याच्या चुकीच्या पत्राचा विचार आपण समाजाने करू नये मी लाॅक डाऊनच्या काळापासून शंभर लग्न लावले असल्याने माझा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मला विरोध करण्यासाठी कुरघोड्या तर होणारच त्यामुळे अशा कुरघोड्या कडे आपण लक्ष देऊ नये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्माचा मार्गाने कार्य करत आहोत आणि शेवटपर्यंत ते कार्य करत राहणार असे बदनाम करण्यासाठी विरोध करण्यासाठी अनेक पुढारी येतील आणि जातील पण मात्र मी माझे काम प्रामाणिक पणे करत राहील.आशा करतो की आतापर्यंत सर्व समाज माझ्या सोबत आहे आणि यापुढेही राहील मात्र आपणास एक विनंती करतो धार्मिक कार्य करत असताना धार्मिक कार्य करणाऱ्या लोकांना चाटाळ राजकीय पुढारीच बदनाम करतात त्यामुळे अशा राजकीय पुढाऱ्यांन पासून आपण सावध राहावे ही आपणास मी एक धम्मबंधू बौद्धाचार्य रमाई फाउंडेशन संस्थापक अमर चौरे आपणास विनंती करतो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्राबदल आपण थोरात यांनाच विचारावं जर नाईक नवरे यांचा मोबाईल माझ्याकडे चुकून आला मी त्यांना दिला तर हे प्रकरण संपले असताना त्यांनी हे प्रकरण एक महिन्या नंतर का वाढवले त्या मागचा त्यांचा हेतू काय आहे हे आपण समाजाने व जाणकार राजकीय पुढाऱ्यांनी आपण त्यांना विचारावं मी माझं कायदेशीर उत्तर त्यांना देईल असे प्रजेचा विकास या वृत्त पञाशी बोलताना चौरे यांनी सांगितले.

Previous articleवंचित बहूजन आघाडी च्या कारंजा(लाड) शहरध्यक्ष पदी सचिन खांडेकर तर तालुका निरिक्षक पदी भारत भगत यांची निवड
Next articleखरे सोशल इंजिनिअरींग वंचित बहुजन आघाडीने केले – निलेश विश्वकर्मा(प्रदेश युवक अध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + nineteen =