पिंपरी,दि.19 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील मध्ये आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आयुक्तालयाच्या हाद्दीतील सर्व पोलिस निरीक्षकांना सुचना व बजावले होते.काही अढळ्यास कारवाही केली जाईल.त्यामुळे शहरात वातावरण तणावाचे होते पहिला नं कोणाचा लागेल याकडे लक्ष होते.चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र जाधव यांना निलबिंत केले आहे. हफ्तेखोरीचा आरोप झालेल्या तसेचअवैध धंदे सुरु असलेल्या पोलिस ठाण्यांचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर कामात बेशिस्त, बेजाबदार, निष्काळजीपणा केल्याबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृषणप्रकाश यांनी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाच आता थेट निलंबित केले. यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तडफदार आणि प्रामाणिक अशी ओळख असलेल्या आर्यनमॅन कृष्णप्रकाश यांची कारकिर्द सर्वानाच लक्षात राहील.नुकतीच त्यांची चिंचवड पोलिस ठाणे येथून नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली होती. चिंचवड पोलीस ठाण्यात असताना त्यांनी एका प्रकरणात सकृतदर्शनी पुरावा नसतानाही गुन्हा दाखल केला. तर, तथ्य नसताना दुसराही गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात 19 आॅक्टोबर 2020 ह्या तारखेला एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून सूर्यास्तानंतर एका महिलेला नियमबाह्य अटक केली गेली होती. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून योग्य पुराव्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक असते. तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणेही ठाणे प्रमुख असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांचे काम आहे. असे असताना जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करत दोन गुन्हे दाखल केल्याने 17 नोव्हेंबरपासून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.