Home ताज्या बातम्या अभिनेत्री पायल घोषने आज खा.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये केला प्रवेश

अभिनेत्री पायल घोषने आज खा.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये केला प्रवेश

86
0

मंबई,दि.26 आॅक्टोबर 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अभिनेत्री पायल घोषने आज राष्र्टीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. अनुराग कश्यपविरोधात पायल घोषने पोलिसातही धाव घेतली होती. मात्र पोलीस चौकशी न झाल्याने तिने आपले म्हणणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे मांडले होते. पायल घोषला आरपीआयचे सर्वासर्व प्रमुख खा. रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. आज रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पायल घोषने आरपीआयचा झेंडा हाती घेतला आहे.
केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री खा.रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेतच पायल घोषचा आरपीआयमध्ये पक्षप्रवेश झाला.पायल घोष, कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकुर चाफेकर यांनी आज आरपीआयमध्ये प्रवेश केला.

पायल घोष आरपीआय मध्ये आल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं. त्यानंतर ते म्हणाले की पायल घोष यांच्यावर अन्याय झाला. अनुराग कश्यपविरोधात तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्यावर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केलं. राज्यपालांना भेटलो, त्यानंतर या प्रकरणी पुढील हालचाली सुरु झाल्या. मात्र अद्याप पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक केलेली नाही. त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. या सगळ्यात आम्ही पायल घोष यांच्यासोबत आहोत असे पञकारांशी बोलताना आठवले म्हणाले.

Previous article‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू – डाॅ.भारती चव्हाण यांच्याकडून सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा
Next articleमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 20 =