हाथरस घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडे द्यावी
पिंपरी,दि.12 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर सामूहिक बलात्कार करणा-या नराधमांना फाशी द्यावी. पिडीत तरुणीचे अंत्यसंस्कार कुटूंबियांच्या परस्पर मध्यरात्री करणा-या पोलिसांवर व तपासी अधिका-यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधिशांकडे द्यावी व यामध्ये किमान एका महिला न्यायाधिशांचा समावेश असावा. तसेच पिडीत कुटूंबाचे पुर्नवसन महाराष्ट्रात करावे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवावा. अशी मागणी ( दि.11)रविवारी मेहतर बाल्मिकी समाज पुणे – पिंपरी चिंचवड सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्यांक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘मशाल महारॅली’ मध्ये करण्यात आली.
पिंपरी मिलींदनगर येथील महर्षी वाल्मिकी मंदीर येथे रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा राहुल डंबाळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करुन निघालेल्या या रॅलीचा समारोप शगून चौकात झाला. कष्टकरी जनतेची आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते बाबा कांबळे, माजी नगरसेवक अरुण टाक, धनराज बिर्दा, आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, रिपब्लिकन युवा मोचार्च नेते राहुल डंबाळे यांनी संयोजन केलेल्या या निषेध सभेत सर्व पक्षीय पदाधिका-यांनी व प्रमुख समाज बांधवांनी योगी सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, ॲड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेविका गीता मंचरकर, नगरसेवक अनिल गावडे, पुण्याचे माजी नगरसेवक राजू परदेशी तसेच अमोल डंबाळे, अनिता साळवे, आधार संघटनेचे अध्यक्ष दलजित सिंह, वंचित बहुजन आघाडीचे गुलाब पानपाटील तसेच भाऊसाहेब अडागळे, मोहन बिडलान, अनिल पारचा, रोहदास वाल्मिकी, संदिपान झोंबाडे, बाळासाहेब भागवत, प्रमोद क्षिरसागर, गोपाळ मोरे, अजय लोंढे, सतिश ओव्हाळ, विजय सौदे, सर्वजीत बनसोडे, मकरध्वज यादव, भारत मिरपगारे, विशाल कसबे, शरद वाघमारे, अनिल चव्हाण, अजय कांबळे, ईश्वर कांबळे आदींसह अनेक महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.