पिंपरी,दि.11 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्षेत्रात उपद्रव करणारे तसेच सार्वजनिक आरोग्यास हानिकारकभ टकी , मोकाट डुकरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सन्मा, नगरसदस्य, नागरिक आदि. मार्फत मोठया प्रमाणात तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्याने, डुकरे पकडणे व त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवार दि.12 आॅक्टोबर 2020 पासून डुकरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार असून सदर डुकरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पञ अरोग्य विभिगाने पशुवैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी-१८ यांच्या सहीने प्रसिद्धिस देण्यात आले आहे
पञातुन अवाहन देखील करण्यात आले की परवानाधारक
डुकरे मालकांनी त्याची डुकरे बंदिस्त ठेवावीत. व ती बाहेर भटकणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अन्यथा कारवाही करण्यात येईल.
भटके व मोकाट डुकरं यांच्यावर कारवाई करण्याचा बडगा पालिकेने घेतला आहे तसेच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा ही बंदोबस्त पालिकेने करावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.