Home ताज्या बातम्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा 63 वा वर्धापनदिन गावागावात साजरा करा-...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा 63 वा वर्धापनदिन गावागावात साजरा करा- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0

दि.01आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 63 वा वर्धापन दिन येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी असून हा वर्धापन दिन गावागावात सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापरून साजरा करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्याना केले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन करण्यात आला.केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे दर वर्षी दि. 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन मोठया उत्साहात लाखोंच्या गर्दीत मेळाव्यात साजरा करताता यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे या प्रथेत यंदा खंड पडत असल्याची खंत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली. यंदा मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिन साजरा करता येत नसेल तरी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी यंदा रिपब्लिकन पक्षाचा 63 वा वर्धापनदिन आपल्या गावात ; तालुक्यात ; शहरात जिल्ह्यात 100 लोकांच्या संख्येची मर्यादा पाळून सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून रिपाइं चा वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले असुन पक्षाच्या मजबुतीच वाढीच काम देखील कार्यकर्त्यानी करावे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − two =