Home ताज्या बातम्या नाशिक हादरले-मनमाडमधील नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या

नाशिक हादरले-मनमाडमधील नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या

65
0

नांदगाव,07 ऑगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नाशिक जिल्हातील मन हेलावुण टाकणारी घटना घडली,मनमाडमधील नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच असताना निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण नाशिक जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.नांदगाव तालुक्यातील वखारी या ठिकाणी ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबातील दोन लहान मुलांसह आई आणि वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामध्ये चार आणि सहा महिन्यांचा मुलांचा समावेश आहे.चव्हाण कुटुंबीय हे नेहमी प्रमाणे आपल्या घराबाहेर झोपलेले होते. गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने समाधान चव्हाण (वय 37) भरताबाई चव्हाण (वय 32) गणेश चव्हाण (वय 6) आरोही चव्हाण (वय 4) अशा चौघांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली.मारेकऱ्याने आईच्या शेजारीच झोपलेल्या लहान मुलगी आरोहीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. एकमेकांच्या जवळच झोपलेल्या कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली असुन. हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Previous articleराम मंदिर:-अयोध्‍येत श्री राम मंदिर भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Next articleवैद्दकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने अादित्य बिर्ला सह डी.वाय.पाटील,सिटी केअर आणि स्टार मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांना नोटीसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + fourteen =