देहुरोड,दि.२८ जुलै २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५५३/२०२० भादंवि कलम ३७६(१), ३३६,३२४,३२३,३४ मधील आरोपी नामे साजन मन्नु मेहरा वय -२६ वर्षे रा.देहुरोड बाजार याने दिनांक -२२/ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०६.३० वा.चे सुमारास पिडित मुलगी (फिर्यादी) पाटील मेडीकलमध्ये औषध घेणेसाठी पायी जात असताना अरोपीने त्याच्या पल्सर मोटार सायकलवर बसवुन घेवुन मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या सर्व्हिस रोडला झाडाखाली नेवुन फिर्यादी पिडित मुलीच्या संमती शिवाय जबरदस्तीने शारीरीक संबध करुन बलात्कार करुन त्याच्या साथिदार अनिकेत झंझोटड यांच्या सह फिर्यादी पिडित मुलीला मारहाण करुन पळुन गेला होता अरोपी वापरत असलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे देहुरोड पोललिसांनी अरोपींना रामवाडी येरवडा येथुन शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केली. अशी माहिती देहुरोड पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा तपास पोउपनि श्री योगेश रामेकर करीत आहेत.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त साो श्री.संदिप बिष्णोई, मा अप्पर पोलीस आयुक्त सो श्री.रामनाथ पोकळे मा पोलीस उप-आयुक्त सो परि -०२ श्री विनायक ढाकणे, मा.सहा पोलीस आयुक्त सो श्री.संजय नाईक-पाटील देहुरोड विभाग, मा, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सो श्री.मनिष कल्याणकर, मा, पोलीस निरिक्षक साो (गुन्हे) श्री गोफणे यांचे मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस स्टेशनकडील पोउनि श्री.योगेश रामेकर पोना-प्रशांत पवार, पोशि-गणेश जगदाळे, पोशि-सचिन शेजाळ, पोशि-सुमित मोरे यांनी केली.