Home गडचिरोली गडचिरोली – 8 नवीन रुग्ण आढळले, तर 9 जण कोरोनामुक्त

गडचिरोली – 8 नवीन रुग्ण आढळले, तर 9 जण कोरोनामुक्त

65
0

गडचिरोली,दि.19 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  गडचिरोली जिल्ह्यात आज 8 नवीन रुग्ण आढळले असून 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये CRPF मधील 4, गडचिरोली तालुक्यातील इतर 3, मूलचेरा व धानोरा येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज नव्याने आढळलेल्या 8 रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 338 झाला आहे. यातील 140 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 197 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात सध्या 1975 जण निरीक्षणाखाली असून 1695 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच 78 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून 343 जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

Previous articleकोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे-उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleभारती चव्हाण यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने संपुर्ण महाराष्र्टात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 3 =