Home ताज्या बातम्या कोरना मुळे एकीकडे शाळांना बंदी तर दुसरीकडे देहूरोड मामुर्डी मध्ये राजरोसपणे घेतली...

कोरना मुळे एकीकडे शाळांना बंदी तर दुसरीकडे देहूरोड मामुर्डी मध्ये राजरोसपणे घेतली जाते ट्युशन-श्रीजीत रमेशन

56
0

देहुरोड,10 जुले 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-
देहूरोड-मामुर्डी या ठिकाणी राजरोसपणे घेतली जाते अनधिकृत पद्धतीने ट्यूशन,इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळेतील महिला शिक्षक यांचा हा पराक्रम,सध्या वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव आणि त्यात सर्व शाळांना बंदी तर एकीकडे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा वाढता जोर होत आहे तर दुसरीकडे कोरोना लॉक डाऊनला फाट्यावर मारत राजरोसपणे खाजगी शाळेतील शिक्षिका गेले पाच-सहा दिवसांपासून घरांमध्ये ट्यूशन शिकवत आहे हीच माहिती तेथील काही ग्रामस्थांनी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांना सांगितले श्रीजीत रमेशन यांनी गुरुवारी दि.9 जुलै रोजी देहुरोड पोलिसांसोबत ट्युशन वर छापा मारला. व ट्युशन वर जाऊन कारवाई केली देहूरोड पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्यामुळे श्रीजीत रमेशन यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले तसेच काहीच खाजगी शाळेतील शिक्षकांना विनंती केली की अशाप्रकारे अनाधिकृत बेकायदेशीर ट्युशन घेऊ नका हा कोरानाचा वाढता प्रादुर्भाव हा कोणालाही मोकळा श्वास घेऊ देणार नाही त्यामुळे आपण शासनाने सांगितलेले नियम पाळावे शाळा सुरू झाल्यानंतर मात्र अधिकृतरीत्या आपण ट्युशन घेऊन विद्यार्थी घडवावे हे विनंती, पुढील कारवाई देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत अशी माहिती श्रीजीत रमेशन यांनी दिली.

Previous articleआज दि. ८ जुलै २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही म्हत्वाचे निर्णय घेण्यात आले.
Next articleविकासनगर मधील व्हिब्स शाळेच्या व महापालिकेकडुन गलथान कारभारा विरोधात आरटीआय कार्यकर्त श्रीजीत रमेशन व माजी नगरसेवक मनोज खानोलकर आज बसणार उपोषणास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 1 =