Home ताज्या बातम्या जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चालु केले होते गुन्हेगारीचे काम, अट्टल सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे...

जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चालु केले होते गुन्हेगारीचे काम, अट्टल सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट 5 ने आवळल्या मुसक्या

70
0

देहुरोड, दि. 01 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चालु केले होते गुन्हेगारीचे काम, अट्टल सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा, युनिट 5 ने आवळल्या मुसक्या मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री संदिप बिष्णोई साो यांनी राबविलेल्या पाहीजे फरारी मोहीमे अंतर्गत श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड यांनी पाहीजे फरारी आरोपी शोधणेकरीता गुन्हे शाखा युनिट 5 कडील अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत करुन सुचना दिल्या होत्या. आदेशाप्रमाणे कारवाई करीत असताना गुन्हे शाखेडकील पोलीस कर्मचारी सावन राठोड यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, कुख्यात गुन्हेगार अनिकेत आनंदा जाधव हा चिकन चौक, निगडी, पुणे येथे येणार असुन त्याने निगडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा केला असुन तो पुन्हा गुन्हे करण्याचे तयारीमध्ये आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमीचा आशय श्री.बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 यांना कळविला असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 5 कडील सपोनि राम गोमारे व पोलीस कर्मचारी सावन राठोड, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, धनराज किरनाळे व दत्तात्रय बनसुडे यांचे एक शोध पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.त्यावर सदरचे शोध पथक मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन दबा धरुन थांबलेले असताना अनिकेत आनंदा जाधव हा तेथे आला त्याला पोलीसांचा संशय आल्याने तो तेथुन पळ काढु लागला त्यास शोध पथकाने शिताफिने पकडुन ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास गुन्हे शाखा, युनिट 5 कार्यालय येथे आणुन त्याचेकडे सखोल तपास केला असता अनिकेत आनंदा जाधव, वय 24, रा. दळवीनगर, निगडी, पुणे असे असल्याचे सांगुन त्याने ओटा स्किम निगडी अजय शेंडगे, मोहम्मद कोरबु व तुषार झेंडें यांचेसह दुचाकी वाहनावर जावुन तेथे असलेल्या आदर्श मगर, विशाल खरात, आमोल जाधव व इतर यांचेशी जुन्या वादावरुन भांडण करुन त्यांना मारुन पैसे लुटले व तेथुन पळ काढला असल्याचे सांगितले. सदर बाबत पोलीस अभिलेख तपासला असता तो निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 45/2020 भादकिव 394, 34 गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयामध्ये तो पाहिजे असल्याचे समोर आले आहे. अनिकेत आनंदा जाधव हा कुख्याल आरोपी असुन त्याचेवर पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत

1. निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 541/2016 भादविक 379
2. निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 615/2016 भादविक 395 म.पो.का.क. 37(1)/135
3. निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 25/2013 भादविक 380
अनिकेत आनंदा जाधव यास निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 45/2020 भादकिव 394, 34 चे पुढील तपासकामी निगडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितिन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांनी केली आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Next article‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजने’च्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार; थेट पद्धतीने दिलेल्या कामाची चौकशी करा – इरफान सय्यद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 3 =