Home ताज्या बातम्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रस्तानासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रस्तानासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

108
0

देहुगाव, दि.१६ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रस्तानासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि.१५ मे ला झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार म्हणाले, राज्याच्या विविध भागातून आषाढी वारीसाठी दिंड्या निघतात, दिंडी किंवा पालखी प्रस्तानासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय दिंडी, पालखी पंढरपूरकडे प्रस्तान करणार नाही, असेही अजीत दादा पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleविकास नगर किवळे मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण ! निघाला पोलिस कर्मचारी
Next articleराज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 14 =