Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड मध्ये दहा जणांन कडुन पोलिसांवर हल्ला!लाथा बुक्यांनी मारहाण

पिंपरी-चिंचवड मध्ये दहा जणांन कडुन पोलिसांवर हल्ला!लाथा बुक्यांनी मारहाण

141
0

पिंपरी,दि.१४ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी) :-कोरोनोचा प्रार्दुभाव वाढत असताना लाॅकडाऊन मध्ये काळजी घेतली जाते त्यामध्ये डाॅक्टर पाठोपाठ मुख्य भुमीका पोलीसप्रशासन बजावत आहे त्यातच काळेवाडी, बोपखेलमधील पोलिसांच्या वरील हल्ल्याच्या घटना ताज्या आहेत, दापोडी येथे पुन्हा पोलिसावर हल्ला झाला. पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. दापोडीत गर्दी पांगवताना दहा जणांनी मिळून पोलिसालाच शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना कर्तव्यावर असताना हल्ले होत आहेत,त्यामुळे सगळी कडे संताप व्यक्त केला जात आहे.आयाज भिकात शेख, गालिब भिकात शेख (वय 28), समीर सलीम शेख (वय 18, सर्व रा. इकरा इंग्लिश मिडीयम स्कुलजवळ, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर इतर सात साथीदार फरार आहेत. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) असे हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी (ता.13) सकाळी पावणेनऊच्या सुमारास दापोडी-बोपोडी पुलाजवळील पवार वस्तीत स्मशानभूमी जवळ गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवताना आरोपींनी वाघमारे यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच. मनुष्यबळ अपुरे असतानातही तारेवरची कसरत करत बंदोबस्त साठीचे नियोजन केले जात आहे. मागील दीड महिन्यांपासून पोलिसांची तारबंळ होत आहे.अक्षरशः झोप उडाली असुन. ते नागरिकांसाठी दिवसराञ कर्तव्यावर चोख ड्युटी करतात.बोपखेल फाटा येथील नाकबंदीच्या ठिकाणी रविवारी (ता.10 मे) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून महेंद्र रविंद्र वाघमारे याने पोलिस हवालदार संजय कामठे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला होता . आरोपीला पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यासह पंधरा दिवसांपुर्वीदेखील बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली.मोकार रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी युनूस गुलाब अत्तार, मतीन युनूस अत्तार, मोईन युनूस अत्तार या तिघांना अटक केली. या घटना ताज्या असतानाच बुधवारी परत दापोडीत पोलिसावर हल्ला झाल्याने नागरिकांकडून निषेध व्यक्त होत आहे.

Previous articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या कडुन कौतुक
Next articleपुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची रुग्णालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 14 =