Home ताज्या बातम्या पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची रुग्णालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची रुग्णालय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

0

बोपोडी,दि.15 मे 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी) :-कोरोनाचा जगभरातच थैमान घातले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मनामध्येही प्रचंड भीती निर्माण झाली आहे. देशातील विविध भागात नागरिकांनी कोरोनामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील बोपोडीत घडली असून कोरोनाच्या भीतीमुळे तरुणाने खासगी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. वीरेंद्र चंद्रकांत जक्कल ( वय 24, रा. मुळा रस्ता खडकी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याला ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला गुरुवारी उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. वीरेंद्रच्या घशातील द्रवाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला कोरोना झाला अशी भीती त्याला वाटत होती. या भीतीमुळे त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली असून घटनास्थळी खडकी पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत घटनेची माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 1 =