Home ताज्या बातम्या तिन्ही झोन मध्ये- मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं हि राहणार खुली

तिन्ही झोन मध्ये- मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं हि राहणार खुली

86
0

पिंपरी,दि.३ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-केंद्र सरकारने दारुची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेड झोनमध्ये दारुची दुकाने खुली होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. मात्र राज्य सरकारने सर्व झोनमध्ये दारुची दुकाने सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दारुची दुकाने सुरू करण्याची मागणी करणाऱ्या तळीरामांना मोठा दिलासा मिळाला.मात्र सरकारने ही दुकाने सुरू करण्यासाठी एक नियमावलही असणार आहे सर्व झोनमध्ये कोणकोणती दुकाने सुरू होणार याची एक यादी जारी केली आहे.रेड झोनमध्येही दारुची दुकाने सुरू होणार असली तरी एमएमआर (मुंबई महामंडळ) व पीएमआर (पुणे महामंडळ) या भागात कडक नियम लागू करण्यात आले आहेत.मुंबई, पुणे महानगर मध्ये रेड झोनमध्ये स्टँड अलोन दुकांनाना उद्यापासून परवानगी ( म्हणजे मॉल वगळता ) सिंगल शॉप दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. एका लाईनमध्ये पाच पेक्षा जास्त दुकांनाना परवानगी नसणार आहे,खाजगी बांधकामे करण्यास (दि.४ मे)उद्यापासून परवानगी देण्यात आली आहे.

कॉन्टेंमेंट हाद्दीमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर दुकानांना परवानगी नाही आहे.रेड झोनमधील काही शहरं वगळता सर्व दुकानं खुली,तर रेड झोनमध्ये सलूनला परवानगी नसली तरी खाजगी बांधकाम करायला परवानगी असल्याचे सांगितले आहे.नोंदणी केलेल्या मजदूर /कामगार / परप्रांतीयांना सरकारच्या परवानगीने रेल्वेने दुसऱ्या राज्यात नेले जात आहे. महाराष्ट्रात दोन जिल्ह्यांमध्ये प्रवासाला ( कुठलाही झोन असला ) तरी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. हे जिल्हा बंदीचे आदेश कायम असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.रेड झोनमधील मुंबई,एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता दिलेली नाही.

रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका वगळून रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील खासगी कार्यालये ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहे. इतर कर्मचाऱ्यांना माञ वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा लागणार, इतर ठिकाणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील सरकारी कार्यालयात उप सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे. तर त्याखालील अधिकारी,कर्मचाऱ्यांची ३३ टक्के च उपस्थिती अपेक्षित

दारुची दुकाने ही फक्त एकच व्यक्ती एका वेळी उभी राहू शकते अशा प्रकारे सुरू करायची आहेत.
– मॉल व फुड प्लाझामधील दारुची दुकाने बंदच राहणार आहेत.
– एका लेनमध्ये अत्यावश्यक सेवेत न येणाऱी फक्त पाच दुकानेच सुरूच राहतील

– दारुच्या दुकानांची वेळ ही स्थानिक प्रशासनाकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन ठरविण्यात येईल
– कोणतेही रेस्टॉरंट व बार सुरू होणार नाहीत.
– सर्व दुकानांवर सोशल डिस्टंसिंग पाळणं बंधनकारक राहिल

– कंटेनमेंट झोनमधील दारुची दुकानं बंदच राहणार आहेत.
ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सलून सुरू होणारराज्य सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सलून, स्पा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र रेड झोनमधील सलून सुरू बंदच राहणार आहेत.

Previous articleकोरोना-देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत,किराणा दुकाने, चिकन – मटण विक्री आठवड्यातुन सोमवार,मंगळवार व बुधवार स.०९ ते दु.१ वा.पर्यत राहणार चालु
Next articleदेहुरोड मध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एकाचा मधमाशी चावल्याने मृत्यु!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − seventeen =