Home ताज्या बातम्या भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे प्रसार माध्यमांना संबोधन

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे प्रसार माध्यमांना संबोधन

100
0

नवी दिल्ली,दि. 31 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोविड-19 प्रतिसादासाठी 19 मार्च 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सशक्त समिती स्थापन करण्यात आली. नीती आयोग सदस्य, प्राध्यापक विनोद पॉल आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के विजय राघवन या समितीच्या अध्यक्ष स्थानी असून विज्ञान संस्था, वैज्ञानिक, उद्योग आणि नियामक संस्था तसेच सार्स-कोव्ह-2 विषाणू आणि कोविड-19 आजाराशी संबंधित अंमलबजावणीबाबत संशोधन आणि प्रगतीबाबत जलद निर्णय घेण्यासाठी ते जबाबदार असतील.

समितीचे अन्य सदस्यांमध्ये सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), सचिव, जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी), सचिव, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), सचिव, दूरसंचार विभाग (डीओटी), सचिव, संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), सचिव, आयसीएमआर, सचिव, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी), आरोग्य सेवा संचालनालय (डीजीएचएस) आणि भारतीय औषध महा नियंत्रक (डीसीजीआय) यांचा समावेश आहे.

वैज्ञानिक उपायांच्या अंमलबजावणीच्या दिशेने समितीने वेगाने काम केले आहे. कोविड-19 साठी चाचणी सुविधांमध्ये वाढ करण्याची निर्णायक आवश्यकता लक्षात घेऊन खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत: डीएसटी, डीबीटी, सीएसआयआर, डीएई, डीआरडीओ आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) अंतर्गत असलेल्या संस्थांना स्वयं-मूल्यांकन आणि त्यांच्या प्रयोगशाळेस मानक आणि कठोर शिष्टाचारा द्वारे संशोधन आणि चाचणीसाठी तयार करण्यास अनुमती देणारे एक कार्यालय निवेदन जारी करण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि आयसीएमआरने ठरविलेल्या प्राधान्यांनुसार चाचणीचा  स्टार निश्चित केला जाईल.

आयसीएमआर द्वारे डीएसटी- श्री चित्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, तिरुअनंतपुरम, डीबीटी- राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्र, तिरुअनंतपुरम, सीएसआयआर- पेशीय अणि आण्विक जीवशास्त्र केंद्र (सीसीएमबी) हैद्राबाद, डीएई- टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांना याआधीच चाचणी प्रयोगशाळा म्हणून सूचित केले आहे. चाचणी करण्यासाठी पायाभूत सुविधा/क्षमता असणाऱ्या इतर प्रयोगशाळा सज्ज करण्याचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या तपासणीसाठी वैज्ञानिक तयारी ठेवण्यात आली आहे. चाचणी केल्यामुळे व्यक्ती आणि परीसारासंदार्भातील विलगीकरण आणि अलगीकरणा संदर्भातील योग्य निर्णय घेता येतील.

मोठ्या प्रमाणावर कोविड-19 आणि सेरोलॉजी चाचणी करण्यासाठी सरकार खासगी क्षेत्रासह काम करत आहे. विषाणूच्या प्रसाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी हे क्लिनिकल संशोधनाला मंजुरी देईल.

विविध मंत्रालये / विभागांनी समर्थित सर्व वैज्ञानिक संस्था एकत्र आल्या असून यासाठी बहु-अनुशासित प्रकल्प सुरू केले आहेत:

  1. औषधांचे पुनर्हेतू आणि औषधांच्या पुनरुत्पादनावरील कृती दलाने योग्य निर्णय घेण्यास परवानगी देण्यासाठी विविध औषध उमेदवारांची सखोल माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. नियामक/कायदेशीर प्रक्रिया देखील सोडवल्या जातील.
  2. आजाराचा प्रसार जाणून घेण्यासाठी आणि कोविड-19 ची वैद्यकीय उपकरणे आणि सहाय्यक आवशक्यतांचा अंदाज लावण्यासाठ गणिताची मॉडेल्स.
  3. भारतात चाचणी कीट आणि व्हेंटिलेटर चे उत्पादन

माहिती वितरणासाठी कृपया “सार्स-कोव्ह-2 कोरोना विषाणू प्रसारांवर अंकुश ठेवण्यासाठी मास्क एमओएचएफडब्ल्यू द्वारा स्पष्टीकरण : घरगुती मास्कवरील मॅन्युअल” देखील पहा.

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Previous articleमालवाहू विमानांद्वारे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा सुरु
Next articleमुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला कोरोना आव्हान तयारीचा आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + five =