Home ताज्या बातम्या कोरोनो मुळे लाॅकडाऊन,नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिला गरजुना मदतीचा हात!केले अन्न धान्य...

कोरोनो मुळे लाॅकडाऊन,नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिला गरजुना मदतीचा हात!केले अन्न धान्य वाटप

43
0

विकास नगर,दि.२८ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ‘ लॉक डाऊन’ जाहीर केला असला तरी या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार आहेत, जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या ‘लॉक डाऊन’च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करू नका.कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे , असे आवाहन नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन केल्यानंतर रोजगार हातावर पोट भरणारे मजुर बिघारी कामगार घर सोडून राहणारे विद्यार्थी असे अडकलेले गरीब गरजु मजूर वर्ग यांच्या वर उपाशी राहण्याची वेळ येत आहे भुकबळी न हो,अरोग्य बिघडु नये हा विचार लक्षात घेऊन
कोरण्याचा प्रादुर्भाव वाढत असताना नगरसेवक आमदार खासदार कुठे गेले असे प्रश्न काही नागरीक करीत असताना नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ विकास नगर किवळे प्रभाग १६ मधील गरीब मजूर वर्गाला तांदूळ पीठ भूक मिटवण्याचे साधन वाटताना दिसत आहेत त्यांना विचारला असता बाळासाहेब ओव्हाळ म्हटले लोक काय चर्चा करतात ह्यापेक्षा वेळेला आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मी लोकांच्या चर्चेचा विचार न करता मजूर वर्ग हा जो हातावर पोट भरणार आहे हा माझ्या वॉर्डांमध्ये व पिंपरी-चिंचवडमध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळे यांचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मी स्वतः नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ व वैष्णवी देवी माता ट्रस्ट यांच्यावतीने आमी ह्या गरजूंपर्यंत एक छोटीशी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळे या कोरोणाशी लढण्यासाठी अत्याअवश्यक सेवा पुरवत आहेत डॉक्टर नर्स पोलीस पत्रकार यांचे मनोबल वाढेल आणि या कोरोणाशी लढा देण्यासाठी सर्व घरात बसतील राहतील आणि या कोरोणाचा आपण नायनाट लवकरात लवकर करू असा आत्मविश्वास वाढत आहे त्यामुळे मी स्वतः हुन नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मदत करण्याचे ठरवले आहे आणि ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे जर लोकांना बोललो तर लोक येथील गर्दी करतील लोकांनी गर्दी करू नये म्हणून मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन त्यांना मदत देत आहे माझं लोकांना एक सांगण आहे कि कृपया आपण आतापर्यंत सहकार्य करत आहात आणि इथून पुढेही सहकार्य करावं आपण घरातून बाहेर निघू नये जर अत्यावशक खूप गरज असेल तरच बाहेर पडा, बाहेर निघाला तर तोंडाला मास्क लावावे घरात गेल्यानंतर त्यांनी हात धुवावे व स्वच्छ तोंड हात पाय धुऊन घरात बसावे दारात सॅनेटरी मारावे जिथे घरांमध्ये आपण टि.व्ही पहावा परिवारामध्ये वेळ घालवा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे खंड जर आपल्या जवळ असतील तर ते वाचावे किंवा एक कोणतेही पुस्तक आपल्याजवळ असतील तर ती वाचावी कारण वाचनाने मस्तक जाग्यावर राहते इच्छाशक्ती वाढते मनोबल वाढते आपल्या ज्ञानात भर पडेल आणि आपल्याला बाहेर जाण्यास इच्छा होणार नाही जे वाचाल ते परिवारामध्ये चर्चा करा त्यामुळे परिवारालाही ही आपल्या मध्ये एकत्र बसण्याची रुची निर्माण होईल आणि आपण ह्या कोरोणाशी लढण्यासाठी सुसज्ज असून खरच आपण यावर मात करू या यावेळी सहगामी फाऊण्डेशनच्या प्राजक्ता रुद्रवार,अशोक बंसल वैष्णवी माता ट्रस्ट अध्यक्ष,माधव हलसंगी,कार्यकर्ते शोभाताई करमासे ,दिलीप जोशी अखीलेश मित्तल वैष्णवी माता मंदीर ट्रस्ट सेक्रेटरी,प्रजेचा विकास चे संपादक विकास कडलक प्रतिनिधी के पी अॅडम उपस्थित होते.

Previous articleकिराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी संकटकाळात भाव न वाढवता माणुसकी जपावी – अरुण जोगदंड.
Next articleकामगारांना स्थलांतरित होण्यापासून रोखण्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा उद्योग आणि व्यापारी संघटनांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 1 =