Home ताज्या बातम्या नांदेड जिल्हातुन जनता कर्फ्यु ला प्रचंड प्रतिसाद! (दि.२२मार्च)आज मध्यराञी पासुन कलम १४४...

नांदेड जिल्हातुन जनता कर्फ्यु ला प्रचंड प्रतिसाद! (दि.२२मार्च)आज मध्यराञी पासुन कलम १४४ लागु

0

नांदेड,दि.२२ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-गोविंद पवार) :- कोरोना विषाणुला जिथल्या तिथेच पायबंद करण्याच्या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दि.२२ मार्च २०२०रोजी ‘जनता’ कर्फ्यु घोषित केला. त्याला नांदेडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. रेल्वे स्थानकासह बस स्थानकातही प्रवाशी फिरकले नाहीत.एसटी महामंडळाने तीन दिवसापूर्वीच लाब पल्ल्यांच्या बस बंद केल्या होत्या. परंतु एकदम बस बंद करणे संयुक्तीक ठरणार नाही. म्हणून महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बस ६० ते ७० किलो मिटर अंतरावरील जिल्ह्यापर्यंत बस सुरु ठेवण्यात आल्या .जिल्ह्यातील हदगाव, बिलोली, माहुर, किनवट, कंधार, भोकर या ठिकाणासह इतर बसस्थानकात एकही प्रवाशी आला नाही.बस स्टॅण्ड व रेल्वे स्थानाकातही शुकशुकाट होता, रेल्वेनी प्रवास करुन पुणे – मुंबई शहरातील प्रवाशी शहरात दाखल होवून संभाव्य कोरोना विषाणु पांगनार नाही याची खबरादारी नांदेडच्या दक्षिण रेल्वे विभागानेही घेतली होती. काही दिवसापूर्वीच मुंबईहून नांदेडला येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी ‘जनता कर्फ्यु’ असल्याने नांदेड रेल्वे विभागाने जवळपास ४२ रेल्वे गाड्या रद्द केल्या. याबद्दलची प्रवाशांना विविध माध्यमातून माहिती पोहचवण्यात आली होती. त्यामुळे रविवारी जनता कर्फ्युमुळे नांदेडच्या रेल्वे स्थानकावर शुकशुकाट होता.व्यापार, उद्योग,दुकाने किरकोळ व्यापारी रिक्षा चालक यांनी कडकडीत बंद पाळला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, महापालिकेचे नगरसचिव अजितपालसिंघ संधु, उपायुक्त विलास भोसीकर यांनी रस्त्यावर उतरुन नागरीकांना ‘जनता कर्फ्यु’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनास नागरीकांनी शनिवारपासून सुरुवात करून मोठा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. वजिराबाद येथील मर्चंड व्यापारी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी सायंकाळीच शहरातील व्यापारी, उद्योजक,यांना आवाहन करुन २३ मार्चपासून तीन दिवस बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने देखील खबरदारी म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णपणे बंद केल्या असून, जिथे अवश्यक आहे त्या रोडच्या गाड्या सोडल्या जात आहेत.
शहरात कडकडीत बंद विदेश, मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदनगर, यवतमाळ अशी बाहेरुन नांदेड शहरात दाखल झालेल्या नागरीकांनी खासगी रुग्णालयात न जाता थेट शासकीय रुग्णालयात जावेत आणि आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, यासाठी खासगी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवारी शहरातील तरोडानाका परिसर, वर्कशॉप, श्रीनगर, शिवाजीनगर, आनंदनगर, भाग्यनगर, अण्णा भाऊ साठे चौक, जिल्हा परिषद परिसर, छत्रपती चौक, राज कॉर्नर, आयटीआय चौक, महाविर चौक, गुरुद्वारा परीसर, जुना मोंढा मार्केट, एमजी रोड, महम्मद अली रोड, बर्की चौक, सराफा बाजार, देगलुरनाका, महाराणा प्रताप चौक, सीडको हडको परिसरासह शहरात ठिकाठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.व पोलीस ठाणे हाद्दीतील पोलीस आपआपल्या हाद्दीत सर्व परिसर फिरुन पहात होते,काही ठरावीक लोक बाहेर दिसल्यास त्यांना बंद पाळा समजावुन सांगत,साय ५.०० वा घंटानाद व टाळी वाजवून राज्य व केंद्र सरकार, डॉक्टर,नर्स,सफाई कामगार, पञकार अत्यावश्यक सेवा पुरविणारे यांचा सन्मान केला, महाराष्ट्रातील व देशातील जनतेचे आभार व्यक्त करत महाराष्र्टाचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी( दि.२२ मार्च)आज मध्यराञी पासुन १४४ कलम लागु केला.

Previous articleआज(दि.२२ मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleकोरोना- MPSC राज्यसेवा राज्यसेवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − three =