Home ताज्या बातम्या ‘कोरोना’ साठी आर्थिक निर्बंध शिथील ! चुकीच्या अफवा पसरवू नयेत,व सहकार्य करावे...

‘कोरोना’ साठी आर्थिक निर्बंध शिथील ! चुकीच्या अफवा पसरवू नयेत,व सहकार्य करावे -उपमुख्यंमञी अजित पवार

35
0

पुणे, दि.२१ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पिपंरी चिचवड व पुणे शहर,येथे जास्त प्रमाणात सतर्कता बाळगली पाहिजे,कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पुढचे 15 दिवस फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेले आदेश पाळा. तसंच राज्य सरकारने काही निर्णय घेताना त्याची मुदत 31 मार्च सांगितली आहे परंतू आता पुढील आदेश निघेपर्यंत सरकारकडून दिलेले आदेश पाळावेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.कोरोना हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे. गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे. तसंच पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड लागणार आहेत ते देण्याचा निर्णय घेतला आहे, महाराष्र्ट सरकारच्य् आखतर्‍यातील परिक्षा पुढे ढकल्या आहेत,दहावी बारावी च्या विद्यिर्थ्थाची वर्ष वाया जाऊ नये म्हणुन त्या सावधानीत घेतल्या एम पी एसी च्या परिक्षा पुढे ढकलण्या संदर्भात संबधीत खात्याशी बोलणे करुन पुढे ढकलले जातील अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.(दि.20)आज संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान आणि केंद्रिय आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय चंदनवाले, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.आधिक माहिती देताना ते म्हणाले, कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. आपल्या देशाला संकट नवीन नाही, या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे सांगून ते म्हणाले, लग्न समारंभाबरोबरच अन्य कार्यक्रमांचे विधीही कमीत कमी व्यक्तींमध्ये साजरे करावेत. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून 5 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. तसेच या परिस्थितीत आवश्यक साहित्य खरेदीचे निर्बंध वित्त विभागाने शिथील केले आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहे. सद्यपरिस्थितीतील प्रादूर्भाव पाहता ३१ मार्च पर्यंत लागू असणारे हे आदेश पुढील आदेश होईपर्यंत सुरु राहतील. रुग्णसेवेत असणा-या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडू नये, याचा विचार करुन पर्यायी डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन दिले जातील. या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा होण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने केले असून अन्नधान्याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालयेही आवश्यक त्या सुविधेसह तयार आहेत. या परिस्थितीत आरोग्य सेवेबरोबरच अत्यावश्यक सुविधा पुरविणा-या कर्मचा-यांचे कौतुक करुन गर्दी टाळण्यासाठी २५ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु ठेवावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत,व सहकार्य करावे असे अहवान केले.

Previous articleकोरोना : -लाईव्ह प्रसारणात’ मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक धीर
Next articleपुणेकरांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × five =