Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधीत आणखी एक रुग्ण आढळल्याची माहिती आली समोर

पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधीत आणखी एक रुग्ण आढळल्याची माहिती आली समोर

73
0

पिंपरी,दि.१५ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
पिंपरी-चिंचवड शहरात करोना व्हायरसची बाधा झालेले आज(दि.१५) आणखी एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.दि.१४ला पाच रुग्ण आढळले होते. अवघ्या २४ तासांत सहा रुग्ण पिंपरी-चिंचवड मध्ये सहा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आढळलेला रुग्ण अगोदर जपान व नंतर दुबईवरून भारतात परतला होता. यानंतर १४ तारखेला त्याची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या स्थितीस पिंपरी-चिंचवडमधील रूग्ण संख्या ९ व पुणे शहारातील रूग्ण संख्या ७ अशी दोन्ही मिळून एकूण १६ रुग्ण संख्या झालेली आहे.महाराष्ट्रातील पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात सापडला होता. त्यानंतर पुण्याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं.या अगोदर पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णासंबंधी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. ‘सध्या जिल्ह्यात १५ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे १६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल काहीजण परदेशातून आले होते. त्यातील तीन जणांना करोना सदृश्य लक्षणं दिसली आहेत,’ असे म्हैसकर यांनी सांगीतले होते.
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली असुन. याचा भाग म्हणून गर्दी होणारी सर्व ठिकाणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढचं पाऊल म्हणजे सरकार करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करोनाबाधित रुग्णानं विलगीकरणास सहकार्य केलं नाही, तर नजरकैदेत ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

Previous articleकरोनो मुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व शासकीय सार्वजनिक कार्यक्रम ३१मार्च पर्यंत रद्द करण्याचे आयुक्तांचे आदेश
Next articleसरकारने काही निर्णय गोंधळात मंजूर केले- चंद्रकांतदादा पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + eleven =