Home ताज्या बातम्या न्या . ब्रिजगोपाल लोया व संबंधित इतर न्यायाधीशांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी-अपना...

न्या . ब्रिजगोपाल लोया व संबंधित इतर न्यायाधीशांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी-अपना वतन संघटना

46
0

पत्रकार निरंजन टकले व राणा अय्युब याना पोलीस संरक्षण द्यावे :-सिद्दकी शेख

पिंपरी,दि ७ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अपना वतन संघटना भर उन्हात बसली बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहला,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर गेटच्या बाजुला पिंपरी चोकात न्या . ब्रिजगोपाल लोया व संबंधित इतर न्यायाधीशांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी अशी अपना वतन संघटनाची मागणी.

देशभरात चर्चिल्या गेलेल्या न्या . ब्रिजगोपाल लोया व संबंधित इतर न्यायाधीशांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करण्याबाबत लेखी तक्रार अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे , गृहमंत्री मा. अनिल देशमुख , मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्ययाधीश यांच्याकडे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, महाराष्ट्राचे पोलीस खाते हे स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे असल्याचा जगभर लौकिक होता, मागील काही वर्षांमध्ये या लौकिकाला डाग लावणाऱ्या घटना घडलेल्या आहेत.भीमा कोरेगाव प्रकरणाची फेरचौकशी करण्याचा अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेऊन महाविकास आघाडी च्या सरकारने पुन्हा आपला लौकिक प्राप्त करण्यासाठी फार चांगले पाऊल उचलले आहे. काही कारणाने खोळंबा आला असला ,तरी महाविकास आघाडी त्यातून मार्ग काढेल याची खात्री आहे,मागील काळात न्या . लोयांच्या संशयास्पद मृत्यूची घटना व त्यानंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये झालेले त्यांच्याशी संबंधित इतर न्यायधीश व बाकीच्या लोकांचा आकस्मिक मृत्यू हा सुज्ञ जनता ,कायदा विश्लेषक , सामाजिक कार्यकर्ते , बुद्धिवंत , विचारवंत व जगभरातील विविध तपास संस्थांनी दाट संशय व्यक्त केलेला विषय आहे. वास्तविक पाहता ज्या प्रकरणाची सुनवाई न्या. लोया हे घेत होते ते एकंदरीत प्रकरण अत्यंत वादग्रस्त ,गुंतागुंतीचे आणि गंभीर आहे.त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनवाई गुजरात राज्याबाहेर मुंबई येथे करण्याचे व एकाच न्यायाधीशांमार्फत करण्याचे आदेश दिले होते. ” गुजरात डायरीज ” या राणा अय्युब नावाच्या लेखिकेने या संदर्भात शेकडो ” स्टिंग ऑपरेशन ” केल्यानंतर बराच उहापोह करून सविस्तर प्रकाश पाडला आहे.सदर पुस्तकावर केंद्र सरकारने अथवा मागच्या एकच गृहमंत्री असलेल्या सरकारने देखील बंदी आणली नव्हती त्यावरून या पुस्तकाचे महत्व लक्षात येते . हे पुस्तक व त्यानंतर निरंजन टकले या पत्रकाराने शोध पत्रकारिता द्वारा बरेचसे धागे-दोरे उलगडलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संशयाचे धुके आणखीनच गडद झालेले आहे.कोणी वाच्यता करत नसले तरी ,या प्रकरणामुळे दस्तुरखुद्द न्यायसंस्था आणि तिथले उच्चपदस्थ देखील अज्ञात दबाव आणि काळजीच्या घेऱ्यात आहेत , हा घेरा नष्ट करणे हे ” न्याय ” कायम करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

या प्रकरणात एक कर्तव्य दक्ष व सक्षम मंत्री म्हणून फक्त आपणच हिम्मत दाखवू शकता याची आम्हाला खात्री आहे, त्यामुळे केवळ आपल्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत देशाच्या जनतेचा आपणावर व न्यायसंस्थेवर असलेला विश्वास आणखी दृढ होण्यासाठी सदर प्रकरणाची विस्तृत आणि खोलपणे चौकशी करून कारवाई करावी अशी विनंती वजा तक्रारअर्ज आम्ही मुख्यमंञ्याना दिला आहे आणि लवकरच त्यांनी लक्ष द्यावे म्हणुन बेमुदत अन्न त्यागसत्याग्रह करत अहोत अशी माहिती अपना वतन संघटनेचे संस्थापक सिद्दकी शेख यांनी दिली.

अपना वतन च्या मागण्या

सदर प्रकरणातील साक्षीदारांचे व इतर संबंधित व्यक्तींचे जबाब पुन्हा नोंदविण्यात यावे.

निरंजन टकले तसेच राणा अय्युब व याकामी शोध घेणाऱ्या इतर लोकांना संरक्षण पुरवून त्यांचेकडे असलेली माहिती या प्रकरणाच्या तपासात नोंदविण्यात यावी. व त्यांनी मिळवलेले दस्तऐवज पुराव्याकामी दाखल करण्यात यावेत .

या प्रकरणात तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांना व साक्षीदारांना विशेष संरक्षण देण्यात यावे .

सदर प्रकरणात तपास पूर्ण करून झाल्यांनतर या प्रकरणाबाबत श्वेतपत्रिका प्रसारित करण्यात यावी.

Previous articleजुन्या वादातुन विकासनगर मधील झिंगाट मिसळ येथे तरुणावर वार व लाथाबुक्याचा मार
Next articleजाधववाडीत सोमवारी वैदीक पद्धतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =