देहुरोड,दि.22 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-महामानव विश्वसुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेण्या आगोदर सन १९५४ रोजी देहूरोड, पुणे.या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुर्तीची स्वहस्ते प्रतिष्ठापना केलीआहे. त्यामुळे भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये या ऐतिहासिक बुद्धविहाराला जागतीक महत्व प्राप्त झाले आहे. या कारणास्तव दि.२५ डिसेंबरला, वर्धापन दिनी भारतामधून व अन्य राज्यामधून या बुद्ध विहाराच्या मुर्तीचे दर्शन घेण्या करिता लाखो लोक दर्शनासाठी येत असतात.ऐतिहासिक बुद्धविहाराची देखभाल करणाऱ्या दोन संस्था(१) बुद्धविहार ट्रस्ट देहूरोड (रजि नं. ए/११९७ / पुणे) व बुद्धविहार कृति समिती देहूरोड (रजि नं. ई/१५४६/पुणे) यांच्या कायमच्या असणार्या वादामुळे महाराष्ट्र शासनाने लाखो व करोडो रुपये निधी मंजुर करुन देखील या ऐतिहासिक बुद्ध विहाराचा विकास रखडलेला आहे.दोन्ही संस्थेचे वाद सन १९९२ ते दि. १८/०२/२०२० पर्यंत चालु आहेत. रवि. दि.१६/०२/२०२०रोजी या पवित्र बुद्धविहार ठिकाणी सकाळी अदांजे सकाळी 11 वा. हाणामारीचे प्रकार, शिवीगाळीचे प्रकार, व गुप्त्या, तलवारी काढण्याची भाषा या दोन्ही संस्थेनी एक मेकांच्या विरोधात केल्या असुन, या पुढे प्रत्येक बुद्ध वंदनेच्या वेळेस बौद्ध नागरिकास त्या ठिकाणी तणाव व दहशदतीचे व भितीचे वातावरण त्या ठिकाणी झाले आहे, यामुळे बौद्ध समाजाच्या नागरिकांमध्ये व जनतेमध्ये या दोन संस्थेविषयी अत्यंत मोठया प्रमाणात चिड निर्माण झाली आहे.अत्ता नागरीकांना फक्त बुद्धविहार हवे आहे. त्या मुळे बौद्ध समाजच्या ४००० नागरीकांच्या सही साक्षीने व बोधिसत्व जनजागृती संघाच्या वतीने ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास हा महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जगातिक पातळीवर करण्यात यावा या मागणी चे निवेदन महा.राज्याच्या संबधीत खात्याना, बोधीसत्व जन जागृती संघाने मागणी केली असुन या मागणीस बौद्ध समाजातून व जनते मधुन वाढता पांठीबा मिळत आहे.ऐतिहासिक बुद्धविहार ठिकाणी या दोन्ही संस्थेचा वाद अत्यंत टोकेला पोहचला असुन,सप्ताहिक वंदनेच्या वेळेस कधीही केव्हा ही मोठ्या प्रमाणात या दोन्ही संस्थे मध्ये, प्राणघातक हल्ला, व जिवहाणी किंवा व मोठ्या प्रमाणात दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे धार्मिक बुद्धविहारास गालबोट लागुन महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात त्याचे पडसाद ही उमटण्याच्या शक्यताही नाकारता येत नाही. तरी एक समजुतीचा इशारा म्हणुन देहुरोड पोलिस स्टेशनला निवेदना द्वारे कळविले आहे.ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड या ठिकाणी कोणताही अनुसुचीत प्रकार घडू नये म्हणुन मा. सहा.धर्मादाय आयुक्त सो. पुणे. यांच्याकडुन तातडीने त्वरीत ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड, पुणे. या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमण्यात यावा. त्यामुळे बुद्धविहार ठिकाणी होणारा संर्घषाचा वाद थांबला तरी आपण ही ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड, पुणे याचा अहवाल व बुद्धविहार ठिकाणी शासकीय प्रशासक नेमण्यात यावा बाबत चे. पत्र मा. सहा. धर्मादाय आयुक्त सो. पुणे. यांना देण्या बाबत योग्य ते सहकार्य करावे. व त्वरीत योग्यती पोलीस कार्यवाही करावी ही विनंती निवेदन दिले.जर या पुढे ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड जि. पुणे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार व दंगल तसेच बुद्धविहाराची विटंबना, झाल्यास त्यास आपण व आपले पोलीस खाते जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.असेही ह्या अर्ज निवेदनात म्हटले आहे.बोधीसत्व जन जागृती संघाने देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर या कडे निवेदन अर्ज देऊ केले.या वेळी बोधिसत्व जनजागृती संघ अध्यक्ष-संगीता नानी वाघमारे,उपाध्यक्ष-परशुराम दोडमणी,सचिव-विजय पवार,सहसचीव- महेश गायकवाड,विश्वस्त श्रीकांत चोपडे आदी.पदाधिकारी उपस्थित होते
Home ताज्या बातम्या बोधीसत्व जनजागृती संघाची मागणीचा जोर कायम ऐतिहासिक बुद्ध विहार देहूरोड,येथे शासकीय प्रशासक,नेमण्यासाठी...