वरळी,दि.१३फेब्रुवारी२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वरळी येते रमाई जयंती दि.07 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली, या साठी सामाजिक कार्यकर्ता रंजनाताई कांबळे उर्फ ( माई )यांचा नेतृत्वाखाली पुणे येथून 30 महिलांनी वरळी येथे रमाई जयंती थाटात साजरी केली. वरळी येथे रमाई जयंती साजरी करण्याचा हेतू असा सांगण्यात आला कि त्यागमूर्ती रमाई चे स्मारक तेथे झाले पाहिजे. 30 कोटी जनतेची माता अजूनही उपेक्षितच आहे. असे मत रंजनाताई कांबळे यांचे होते व वंचित बहुजन आघाडीच्या सक्षम कार्यकर्ता वरळी येथे रमाई स्मारक झाले पाहिजे यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे मत भीमा ताई तुळवे यांनी मांडले. या साठी विशेष सहकार्य साधना ताई मेश्राम, ढाले ताई पुणे आणि मुंबई येथून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता शिल्पा रणदिवे, तसेच पुणे येथुन आलेल्या महिला भगिनींचे स्वागत नाशिक च्या योजना ताई भगत आणि मुंबई1 येथील सारिस दादा डोळस यांनी केले. या जयंती उत्सवासाठी महाराष्ट्रातून उपासक उपासिका राजकीय सामाजीक सर्वस्त रातुन लोक उपस्थित होते.