Home ताज्या बातम्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य – रामदास आठवले

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य – रामदास आठवले

60
0
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई ,दि.15 फेब्रुवारी 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे. मात्र या महत्वपूर्ण निर्णयावरून राज्य सरकारमधील गृह मंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांची मतभिन्नता जाहीर उघड झाली आहे. राज्य सरकार मधील निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमत करून घेतले गेले पाहिजेत. भीमा कोरेगाव चा तपास एन आय ए कडे देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकार मधील मतभेद चव्हाट्यावर येणे योग्य नसल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.भीमा कोरेगाव प्रकरणातील एल्गार परिषदेचा तपास एन आय ए करणार आहे त्या बरोबर भीमकोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या  हल्ल्याचाही ; एकूण भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एन आय ए ला देण्यात यावा अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे.एखाद्या प्रकरणावरून राज्य सरकार मधील सत्ता पक्षांतील नेत्यांचे जाहीर वाद होणे  योग्य नाही. असे या पूर्वीही कधीही झाले नाही

Previous article30 कोटी जनतेची माता अजूनही उपेक्षितच आहे- रंजनाताई कांबळे
Next articleसंत सेवालाल महाराज जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − seven =