Home ताज्या बातम्या आजची परिस्थिती चिंताजनक व पत्रकारिता पक्षनिष्ठा आणि धर्मनिष्ठेला लोटांगण घालणारी- राजकुमार बडोले(माजी...

आजची परिस्थिती चिंताजनक व पत्रकारिता पक्षनिष्ठा आणि धर्मनिष्ठेला लोटांगण घालणारी- राजकुमार बडोले(माजी सामाजीक न्याय राज्य मंञी)

100
0

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पञकारीता पुरस्कार साप्ताहिक व आॅनलाईन न्युज चॅनल प्रजेचा विकासचे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्हि.चे पुणे जिल्हा प्रतिनिधी विकास कडलक यांंना देण्यात आला

नागपुर,दि.1 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राला ३१ जानेवारी रोजी १००वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून युगंधर क्रिएशन, वंदना संघ दीक्षाभूमी, लॉर्ड बुद्धा मैत्री संघ आणि संथागार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दीक्षाभूमीवर करण्यात आले. यावेळी माजी सामाजीक न्याय राज्यमंञी राजकुमार बडोले स्वागतध्यक्षीय भाषणात बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, पीडितांवर होणाऱ्या अन्याय,आत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला, पण त्यांची पत्रकारिता आक्रमक होती तेवढीच संयमीही होती.आज परिस्थिती चिंताजनक आहे.आजची पत्रकारिता पक्षनिष्ठा आणि धर्मनिष्ठेला लोटांगण घालणारी असल्याची खंत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.तर लाॅर्ड बुद्धा चॅनलचे संंचालक भैय्य्याजी खैरकर हे प्रास्ताविकात बोलताना म्हणाले या देशातील भांडवलदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत ते पञकारांना तेवढी किंमत देत नाहीत आणि छोटे पत्रकार आहेत ते आपल्या परिस्थितीत चळवळीचे काम करतात सगळेच काम करता करता बाबासाहेबांचं नाव त्यांच्या छोट्याशा पत्रकामध्ये ते छापतात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य त्यांच्या पेपर च्या माध्यमातून थोडे थोडे का होईना ते जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोचवतात आणि बाबासाहेबांचे विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हल्ली टीव्ही मीडियाचा किती जरी उदय आणि विकास झाला तरी टी व्हीच एकच बटन वरुन दाबलं की टीव्हीचा आवाज बंद होतो टीव्हीचा बटन वर्षातून एकदा दाबलेच जाते,हे जे वृत्त पञ आहे, त्याचं बटन दाबता येत नाही अर्ध्या रात्री म्हणलं तरी आपली गोष्ट हे लोकांपर्यंत पोहोचवता येते म्हणून ह्या वृत्तपत्राचे महत्व आताच्या ही जगात खूप आहेत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे फक्त वृत्तपत्राच्या माध्यमातूनच होत असते असेच वृत्तपञ बाबासाहेबांनी मुकनायक पाक्षिक काढुन सुरुवात केली होती त्याला पक्षिकाला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही भारतातील सर्व छोटे-छोटे जे पत्रकार आहे चळवळीत काम करतात त्यांना डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार या नावाने दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली याठिकाणी हा पुरस्कार वितरण करत आहोत असे संबोधीत केले तर बबन वाळके ज्येष्ठ पत्रकार यांनी यावेळी बोलताना सांगितले की बुद्धीवादी आहे ते बाबासाहेबांची पत्रकारिता मानायला तयार नाही त्यामुळे बाबासाहेबांचा आवाज आणि बाबासाहेबांची पत्रकारिता हे समजून घेतले पाहिजे कारण बाबासाहेबांनी मूकनायक प्रबुद्ध भारत जनता असे वृत्तपत्र काढून त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारिता करत अनेक लोकांना दाखवून दिले आहे आणि बाबासाहेबांची पत्रकारिता हे एक सत्याला वाचा फोडणारी आणि जगाला एक नवी दिशा देणारी होती त्यामुळे बाबासाहेबांची पत्रकारिता हे खूप उत्तुंग आणि ज्ञानाचा महासागर होते अनेक बौद्ध राष्ट्रांच्या घटनांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत याकडे कधी लक्ष देणार आहोत अनेक पत्रकार आपापल्या परीने वेगवेगळ्या गोष्टी आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी ह्या पत्रकारांना वाईट सवयी लावले आहेत तरी त्या पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण त्या सवयी सोडून ज्यांना खरंच पत्रकारितेचा पैसा कमवणे हा हेपत्रकारितेचा साधन म्हणून वापर करू नका सत्यालि न्यायाला घटनेला वाचा फोडणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे समाजामधील परिस्थिती लोकांपुढे मांडणे याकडे पत्रकारांनी लक्ष दिले पाहिजे जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमावता येते पण राजकीय पुढार्‍यांचे मात्र दलाल होऊ नका.याप्रसंगी देवीदास घोडेस्वार, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव,डॉ. प्रदीप आगलावे,डॉ. बबनराव तायवाडे,उद्योजक सी.आर. सांगलीकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे,गोविंद पोतदार, राजेश काकडे, अॅड.सुनील सौंदरमल, राहुल रंगारी आदी.मान्यवर उपस्थित होते. यावेळी एस.एन. विनोद यांनी टीव्हीच्या मेनस्ट्रीम मीडियावर सडकून टीका केली. या समारोहा दरम्यान मुकनायक शताब्दी वर्षानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पञकारीता पुरस्कार साप्ताहिक व आॅनलाईन न्युज चॅनल प्रजेचा विकासचे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्हि.चे पुणे जिल्हा प्रतिनिधी विकास दिलीप कडलक यांंना देण्यात आला तसेच सम्राटचे दत्ता सुर्यवंशी,रामदास लोखंडे,विनोद चांदमारे,राजु भालेराव,परभणी दैनिक सम्राटचे मंचक खंदारे,अकोला लाॅर्ड बुद्धा टि.व्हि चॅनलचे प्रतिनिधी मनीष खर्चे, नांंदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे व ‘लोकमत’चे
वरिष्ठ उपसंपादक आनंद डेकाटे यांच्यासह केवल जीवनतारे, रवी गजभिये, योगेश चिवंडे, नरेश वाहाणे,संध्या राजूरकर, मिलिंद फुलझेले,उत्तम शेवडे, भीमराव वैद्य, विजय गजभिये, भीमराव लोणारे, पंकजकुमार डहाट, राजकुमार पाटील, राजेंद्र फुले,ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, विकास जीवने, राजेंद्र अतकरे, शेखर सोनी,कोमल कुमेरिया, धम्मचारी नागकेत अशा ६२ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सुञ संचालन प्रा. विवेक अलोणी यांनी केले. आयोजन लाॅर्ड बुद्धा टि.व्हि चॅनल व विदर्भ टि.व्हि चॅनलचे संचालक सचिन मून,प्रशांत शहारे,सतीश कागदे, जगदीश खापेकर, रामटेके आदींचा सहभाग होता. यावेळी युगंधर क्रिएशन तर्फे सजलेल्या बुद्ध भीम गीतांच्या-मैफिलीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleमहिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल-देवेंद्र फडणवीस
Next articleमनसेने भाजपला ‘इंजिन’ भाड्याने दिलेय; काँग्रेसची बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 2 =