Home ताज्या बातम्या प्रजेचा विकास चे संपादक व लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी...

प्रजेचा विकास चे संपादक व लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विकास कडलक यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर

67
0

नागपुर,दि.२३ जानेवारी २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
युगंधर क्रिएशन, वंदना संघ दिक्षाभूमी आणि लॉर्ड बुद्धा मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५.००
वाजता पवित्र दिक्षाभूमी, नागपूर येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता
पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला असुन .पञकारांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्या मध्ये प्रजेचा विकास-साप्ताहिक व आॅनलाईन न्युज चनलचे संपादक व लॉर्ड बुद्धा टिव्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विकास दिलीप कडलक यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन.३१ जानेवारी २०२० रोजी देण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे सन १९२० मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या “मुकनायक’ या वर्तमानपत्रास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या समारोहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तरी या पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थित राहावे, असे अहवान अयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष
आयु. राजकुमारजी बड़ोले(माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र)असुन विशेष उपस्थिति मध्ये आयु रमेशजी थेटे-(वरिष्ठ आयएएस सेक्रेटरी,मध्यप्रदेश शासन),मा. भूषणकुमार उपाध्याय(पोलिस आयुक्त, नागपुर) तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिति मध्ये आयु बबनराव वाळके (वरिष्ठ पत्रकार) आयु एस एन विनोद (वरिष्ठ पत्रकार),आयु गजाननजी निमदेव (संपादक तरुण भारत),आयु भैय्याजी खैरकर (लॉर्ड बुद्धा टिवी) आयु डॉ. बबनराव तायवाड़े (ओबीसी संघ) आयु सी आर सांगलीकर (उद्योजक पुणे),आयु प्रमोदजी मानमोड़े (अध्यक्ष, निर्मल समुह), आयु विलासभाऊ गजघाटे (दीक्षाभूमी स्मारक), आयु प्रा.देविदासजी घोडेस्वार (वंदना संघ),आयु डॉ.प्रदीप आगलावे (विचारवंत) आयु प्रदीपभाऊ ऊबाले (प्रहार सेवक) आयु अमितभाऊ मेश्राम (उद्योजक पिंपरी चिंचवड़),आयु राहलजी रंगारे (कौटिल्य अकादमी भोपाल),आयु राजेशजी काकड़े (जनसुराज्य संघटना),डॉ उदयजी धाबर्डे (सर्जन, छत्तीसगड़),आयु सुधाकरराव इंगोले (टायगर फोर्ट रिसोर्ट),आयु अँड.सुनील सौदरमल (अध्यक्ष, आधार मल्टीस्टेट),आदी उपस्थित राहणार आहेत.
आधिक माहिती साठी संपर्क-
सचिन मून(संचालक लाॅर्ड बुद्धा टि.व्ही)
मो.क्र. ९६६५०३२३३२
प्रशांत शहारे
मो.क्र.९७६४४१२५९८
महेश नागपूरे
मो.क्र. ९८२२७१०५१३
कार्यक्रमाचे निमंत्रक- एम.एस.जांभुळे, सतीश कागदे, जगदीश मनोहर खापेकर,
बंडुभाऊ बहादुरे, मिलींदभाऊ उके, नाना इंगळे, प्रमोदजी ठाकरे
युगंधर क्रिएशन वंदना संघ दीक्षाभूमि आणि लॉर्ड बुद्धा मैत्री संघ सर्व कार्यकर्ते पदाधिकारी

Previous articleनागरिकत्व नोंदणी (NRC) आणि दुरुस्ती कायदा (CAA) रद्द करा-संविधान बचाव समिती पिंपिरी चिंचवड शहर ची मागणी
Next articleमहाराष्ट्र बंद मागे,हा बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + twenty =