Home ताज्या बातम्या केसी पाडवी यांच्यावर राज्यपाल भडकले, पुन्हा शपथ घ्यायला लावली

केसी पाडवी यांच्यावर राज्यपाल भडकले, पुन्हा शपथ घ्यायला लावली

40
0

मंबई,दि.30 डिसेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसकडून अॅड. केसी पाडवी यांनी शपथ घेतली. मात्र यावेळी शपथ घेताना त्यांच्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच भडकले व त्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली.केसी पाडवी यांनी शपथ घेताना सुरुवातीला दिलेल्या पत्रातील सर्व मजकूर वाचला.मात्र तो मजकूर संपल्यानंतर त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत जनतेचे आभार मानले. मात्र शपथपत्रात लिहलेल्या मजकूरापेक्षा जास्त बोलल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्यावर भडकले व त्यांनी पाडवी यांना पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली. ॲड. के. सी. पाडवी हे काँग्रेसकडून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Previous articleतुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही’ असे वक्तव्ये करणार्‍या आढळरावांचा सोशल मीडियावर निषेध
Next articleफेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला महिला आघाडीने दाखवला हिसका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 12 =