Home ताज्या बातम्या देहुरोड धम्मभुमीवर एक लाख बौद्ध अनुयांच्या उपस्थित पार पडली बुद्ध वंदना

देहुरोड धम्मभुमीवर एक लाख बौद्ध अनुयांच्या उपस्थित पार पडली बुद्ध वंदना

60
1

देहुरोड,दि.25 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
ऐतिहासिक धम्मभुमी देहूरोड बुद्ध विहार या ठिकाणी एक लाख बौद्ध अनुयांची बुद्ध वंदना पार पडली यावेळी बनते ज्ञानज्योती व त्यांच्यासोबत भिकू संघ व याचना करण्यासाठी काही महिला वर्ग यांनी हा सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडला यावेळी भन्ते गणास प्रथम याचना करण्यात आली व त्यानंतर त्रिशरण पंचशील व बुद्ध पूजा घेण्यात आली विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा सोहळा दिनी 22 प्रतिज्ञा अवलोकन केलं त्या बावीस प्रतिज्ञा या ऐतिहासिक भूमीवर एक लाख अनुयायांच्या मुखातून वदवण्यात आल्या व त्या 22 प्रतिज्ञांचे पालन करावं असा एक संदेश या आजच्या एक अनोख्या बुद्धवंदना इथून पार पडला अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम करत असतात पण एक लाख बौद्ध अनुयायी एकत्र येऊन बुद्ध वंदना घेणे हा उपक्रम धम्मभूमी वर एक ऐतिहासिक सोहळा ठरला याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथील पुष्पमाला अर्पण समिती व रमेश जाधव, विजयजी कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमावर अनेक लोकांनी टीकाटिप्पणी केली पण या कार्यक्रमाचा सोहळा पार पडल्यानंतर हा कार्यक्रम कोणीही व्यक्तिगत व्यक्तीचा नसुन हा तुमचा आमचा व एक लाख लोकांच्या उपस्थितीत धम्मभूमीवर पार पडली या धम्मभूमीचे वैशिष्ट्य म्हणलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली म्हणजेच 1956 ला दीक्षा घेण्याच्या दोन वर्षांआधी ऐतिहासिक बुद्धमूर्ती या धम्मभूमीवर प्रस्थापित केली व जनतेस दाखवून दिलं की मी 1956 ला कोणता धम्म घेत आहे ह्या अनोखा उपक्रम करून या धम्मभूमीवर बाबासाहेबांना या उपक्रमातुन एक लाख आनुयांच्या मार्फत या वंदनाच्या मार्फत खरच बाबासाहेबांना एक मानवंदना देण्यात आली असेच कार्यक्रम वारंवार प्रत्येक स्थळावर होत गेले तर नक्कीच बोध्द अनुयायांमध्ये एक प्रेरणादायक वातावरण निर्माण होईल आणि याचा परमार्श घेऊन अनेक धम्म बांधव एकत्र वावरण्यास त्यांची इच्छा उपलब्ध होईल व एकत्र येऊन अनेक उपक्रम राबवत अनेक कार्यक्रम घेतील या अनोख्या एक लाख बुद्ध वंदना च्या स्टेजवर एक साईडला 22 प्रतिज्ञा झळकत होत्या तर एक साईडला संविधानाची प्रास्ताविका झळकत होती आणि मध्ये या विश्वाची पृथ्वी झळकत होती आणि त्यावर या बौद्ध भिख्खुं चा एक संघ या ठिकाणी आपणास पाहायला मिळाला या वंदने चा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सर्व बौद्ध अनुयायी सर्व संघटना व देहूरोड बुद्धविहार पंचक्रोशीतील सर्व गावे यांचा सहभाग आहे ही वंदना घेण्यात कोणाही एका व्यक्तीचं श्रेय नसून कोणीही एका व्यक्तीने त्याचं श्रेय लाटण्यासाठी वेगळ्याप्रकारे कामगिरी केली असली तरीही वंदना आज झाल्यानंतर एकंदरीत पाहायला मिळते ही वंदना तुमच्या आमच्या सर्व लोकांची आहे आणि ही वंदना घेण्यामागे सर्व तुम्ही आम्ही सर्वजण इथे एकत्र आहोत ह्या धम्मभूमी ला एक अनोखी मानवंदना याठिकाणी देण्यात आली

Previous articleधम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदनेसाठी परवानगीचा फलक काही संघटनेच्या विरोधामुळे व बातमी नंतर काढण्यात आला
Next articleविद्यार्थिनीची निमडाळे गावातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

1 COMMENT

  1. *ऐतिहासिक महाबुध्दवंदना कार्यक्रम खूप छान नियोजित पध्दतीने मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सर्व कमिटी मेंबर आणि सहकारी समस्त जणांचे हार्दीक अभिनंदन आणि महत्त्वाचे म्हणजे संकल्प पुष्पमाला अर्पण या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो…* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + twelve =