Home ताज्या बातम्या विद्यार्थिनीची निमडाळे गावातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थिनीची निमडाळे गावातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

79
0

धुळे,दि.26 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील निमडाळे गावांमधील आनंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलींचे बालगृह याठिकाणी इयत्ता दहावीत शिकत असलेल्या प्रियंका अहिरे या विद्यार्थिनीने वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या वर्षातील ही काही पहिली घटना नसून जिल्ह्यात या आधी देखील याप्रमाणेच वसतिगृहात मुलींनी आत्महत्या केल्याची घटना झाल्या असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या या वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आत्महत्येमागील नेमके काय कारण होतं याचा पोलीस शोध घेत आहेत. मला अभ्यास करायचा आहे तुम्ही बाहेर जा असं मैत्रिणींना सांगत प्रियंकाने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बराच वेळ झाल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी दरवाजा ठोकला तरीही दरवाजा उघडला नाही. म्हणून, शंका आल्याने तेथील महिला अध्यक्ष यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रियंकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. प्रियांकाने ही टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तरी याचा तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleदेहुरोड धम्मभुमीवर एक लाख बौद्ध अनुयांच्या उपस्थित पार पडली बुद्ध वंदना
Next articleमहेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचा वतीने भोसरीत दुर्गसंवर्धनाचा संदेश देणारा किल्ले बनविण्याचा जागतिक उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − 6 =