Home ताज्या बातम्या आता राजकारणासाठी नावाचा वापर थांबेल; काँग्रेसची भाजपवर टीका

आता राजकारणासाठी नावाचा वापर थांबेल; काँग्रेसची भाजपवर टीका

75
0

नवीदिल्ली,दि.9 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रामजन्मभूमी आणि बाबरी मश्जिद वादावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वाच्या निर्णय दिला आहे. या निकालाचे अनेकांनी स्वागत केलं आहे. आता भाजप आणि इतर पक्षांना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी भाजपवर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे फक्त राम मंदिराच्या बांधकामाचा दरवाजा उघडला नाही. तर, भाजप आणि इतर पक्षांना या विषयाचे राजकारण करण्याचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे यापुढे राजकारणासाठी श्रीरामाच्या नावाचा उपयोग थांबेल, अशीही टीका सुरजेवाल यांनी केली आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागा मश्जिद नव्हती.तिथे राममंदिराचे अवशेष सापडले असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने ही जागा राम मंदिर न्यासाकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तब्बल 134 वर्षांनंतर राम मंदिर-बाबरी मश्जिद वादावर निकाल देण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील हा ऐतिहासिक निर्णय सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली घटनापिठाने हा निर्णय दिला आहे.

Previous articleपालकमंत्री डॉ. अनिल बोडे यांनी केली शेतीची पाहणी…
Next articleआमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डीतील नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven − six =