अमरावती,दि.9नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज अमरावती जिल्हा प्रतिनिधी):-
चांदुर बाजार तालुक्क्या मधील आसेगाव पूर्णा आणि परिसरातील परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील वर्षी दुष्काळानंतर यावर्षी नुकसान भरून निघेल असे वाटत असताना गेल्या काही दिवसांपासून हाता तोंडाशी घास डोळ्या समोरून फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन तूर कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. पालकमंत्री पाहणी दरम्यान भेटी दिलेल्या सर्वच शेती व क्षेत्रफळ बाधित झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी आपले दुःख जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कृषिमंत्री अनिल बोन्डे यांच्या पुढे मांडले. हे ऐकून भावूक झालेले पालकमंत्री यांनी तात्काळ सांबधित अधिकाऱ्यांना शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
त्यासोबतच सर्वानी पीक विमा फॉर्म भरण्याची विनंती सुद्धा केली..
तेव्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चोव्हाळे, उपजिल्हाधिकारी राहुल सातपुते, एस. डी.ओ. संदीप कुमार अप्पर , तहसीलदार उमेश खोडके, तालुक्का कृषी अधिकारी योगेश संगेकर मंडळ अधिकारी जी.एम.दाते, तलाठी एम.एस. पाखरे, कृषी सहाय्यक एम बी होले, ग्रामसेवक डी. एस. भूस्कटे, आत्मा प्रकल्पाचे निशांत इंगळे, विमा प्रतिनिधी एस. डी.वडार, इंडिया अग्री. विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश गुल्हाने, समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.