Home पिंपरी-चिंचवड चिखलीत दसऱ्यानिमित्त भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन; भोसरीत बदल हवा असा उपस्थित जनसमुदायाचा नारा

चिखलीत दसऱ्यानिमित्त भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन; भोसरीत बदल हवा असा उपस्थित जनसमुदायाचा नारा

77
0


पिंपरी,दि 9 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  दसऱ्यानिमित्त चिखली, साने चौक येथे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विलास लांडे व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते विरोधकांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रचंड जनसमुदायाने भोसरी मतदारसंघात आता बदल हवाच, असा नारा यावेळी दिला.

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने दरवर्षी दसऱ्यानिमित्त चिखलीमध्ये रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे यंदाच्या वर्षी चिखलीत होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दत्ता साने यांनी आमदार महेश लांडगे यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ते रावण दहन कार्यक्रमात काय वेगळी शक्कल लढवतात याबाबतही मतदारांना उत्सुकता लागली होती. त्यानुसार दत्ता साने यांनी चिखलीतील साने चौकात यंदा हटके पद्धतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष वेधले.

साने यांनी भोसरी मतदारसंघात वाढलेली गुंडगरी आणि भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. रावणाच्या पुतळ्याला विस्कळित कायदा सुव्यवस्था, गुंडगिरी, अनधिकृत बांधकामांचा प्रलंबित प्रश्न, रेडझोन, शास्तीकर, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला सुरक्षा तसेच चला भोसरीकर जागे होऊया, भयमुक्त भोसरीसाठी एकत्र येऊया, असे लिहिलेले फलक लावण्यात आले होते. या रावणाच्या पुतळ्याचे भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते दहन करण्यात आले.

या रावण दहन कार्यक्रमाला चिखलीकरांनी अलोट गर्दी केली होती. अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचे या गर्दीने जल्लोषात स्वागत केले. विलास लांडे यांनी भोसरी मतदारसंघात गुंडगिरी वाढली आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना केला. त्यावर उपस्थित प्रचंड जनसमुदायाने “होय” असे उत्तर देत भोसरी मतदारसंघात आता बदल हवाच, असा नारा दिला.

Previous articleभोसरीची “दादा”गिरी संपवून भय व भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघासाठी विलास लांडेंना पाठिंबा; निगडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचा निर्णय
Next articleथेरगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकही बुथ लावू देणार नाही – शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 7 =