Home मावळ सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

0

तळेगाव, दि. 11 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  –  मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचा गुरुवारी वडगाव मावळ, कामशेत भागात दौरा झाला. विविध गावांमधून काढलेल्या प्रचारफेऱ्यांना, पदयात्रांना स्थानिक ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना बापू भेगडे बोलत होते. आमच्याकडे कामे झाली, ती राष्ट्रवादीने केली. भाजपाने आमच्याकडे कसलेही काम केले नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आमच्या गावातून जास्त मतदान देऊन भेट देणार आहोत, असे मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले.
वडगाव येथे गुरुवारच्या आठवडे बाजारात फेरफटका मारत सुनिल शेळकेंनी शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधला. वडगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचारफेरीत जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, तुकाराम ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे, हेमांगी ढोरे, मीनाक्षी ढोरे, प्रमिला बाफना तसेच मंगेशकाका ढोरे, गंगाराम ढोरे, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, भाऊ ढोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
जांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, मोहितेवाडी, साते,कान्हे, अहिरवडे, नायगाव, कामशेत, कुसगाव, येवलेवाडी, चिखलसे, पाथरगाव या गावांनाही शेळके यांनी भेट दिली. जांभूळमध्ये उपसरपंच अंकुश काकरे तसेच अमोल जांभूळकर,अरुण जांभूळकर, श्रीपाद पोटवडे, सुरेश नवघणे, विकास जांभूळकर, रमेश गाडे, सुनील जांभूळकर,  तृप्ती जांभूळकर, सीमा जांभूळकर, उर्मिला जांभूळकर, चंद्रभागा जांभूळकर यांनी तर ब्राह्मणवाडी येथे सरपंच रामभाऊ शिंदे, उपसरपंच नवनाथ शेळके तसेच विशाल नवघणे, राजू शिंदे, उमेश शिंदे, नीलेश शिंदे, वाघू नवघणे यांनी शेळके यांचे स्वागत केले. 
कान्हे येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, सरपंच पूनम सातकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, सुनील अण्णा शेळके युवा मंच, महिला बचत गट, भैरवनाथ मित्र मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, ॐ साई मित्र मंडळ, धम्मदीप मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, शिवप्रसाद मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ आदींनी शेळके यांना पाठिंबा दिला. कान्हे गावच्या सरपंच पूनम सातकर म्हणाल्या की, कान्हे गावाला राजकीय वारसा आहे. विरोधकांनी सुनील शेळके यांना महाभारतातील कर्णाची उपमा दिली त्यामुळे कर्णाप्रमाणे सुनील शेळकेही दानत असलेला माणूस आहे हे विरोधकांनी मान्य केले आहे.  अहिरवडे गावचा 40 वर्षे रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूर्ण केला तसेच रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी दिला आम्ही आमच्या गावच्या भविष्यासाठी सुनील शेळके यांना आमच्या गावातून बहुमत देणार असे अहिरवडे येथील रहिवाशांनी सांगितले.  कामशेतमध्ये सुनील शेळके यांच्या प्रचारादरम्यान कामशेत ग्रामस्थांनी बाजारपेठेतून भव्य पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान व्यापारी समाजातील अनेक बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन आण्णांचे स्वागत केले. कामशेत येथील चित्तोडीया समाजानेही सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला. चिखलसे येथे गणेश काजळे, बाळासाहेब काजळे, विजय काजळे, कैलास काजळे, अनिल सातकर, नीलेश काजळे, तुकाराम काजळे, गणेश मधुकर काजळे आदींनी शेळके यांचे स्वागत केले.

Previous articleमोशी, डुडुळगाव भागातील तरूणाईची सेल्फी,विलास लांडे; कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन
Next articleभोसरी मतदारसंघातील जनता विलास लांडेंच्या पाठीशी; कपबशीचा विजय पक्का – उत्तम आल्हाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − five =