Home पिंपरी-चिंचवड भोसरी मतदारसंघातील जनता विलास लांडेंच्या पाठीशी; कपबशीचा विजय पक्का – उत्तम आल्हाट

भोसरी मतदारसंघातील जनता विलास लांडेंच्या पाठीशी; कपबशीचा विजय पक्का – उत्तम आल्हाट

77
0

भोसरी ,दि 11 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  विरोधकांनी कितीही दहशत माजवली तरी भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आता डोळे उघडले आहेत. जागी झालेली ही जनता आता माजी आमदार विलास लांडे यांनाच निवडून देईल. मोशी आणि डुडुळगावांतील सर्व जनता विलास लांडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उत्तम आल्हाट यांनी व्यक्त केला. जनतेकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे या निवडणुकीत कपबशीचा विजय पक्का असल्याचेही ते म्हणाले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी शुक्रवारी (दि. ११) डुडुळगाव आणि मोशी परिसरात पदयात्रेद्वारे प्रचार केला. सकाळी नऊ वाजता डुडुळगाव गावठाणातील नाथ मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी पदयात्रेला सुरूवात केली. धायकवस्ती, सस्तेवाडी, आल्हाटवाडी, लक्ष्मीनगर उत्तर आणि दक्षिण, मोशी गावठाण, शिवाजीवाडी, गायकवाडवस्ती, इंद्रायणी पार्क, नागेश्वरनगर, देहू रस्ता, बारणेवस्ती, वाघेश्वर कॉलनी, बोराडेवाडी, सावतामाळीनगर, विनायकनगर, जुना जकात नाका, हजारेवस्ती, बाराटेवस्ती, बनकरवस्ती, पुणे-नाशिक रोड पश्चिम-पूर्व, आदर्शनगर, खान्देशनगर आणि तापकीरनगर येथे प्रचार पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेदरम्यान विलास लांडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

लांडे यांनी घरोघरी जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. दहा वर्षे आमदार असताना केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडला. आपल्या राजकीय जीवनाच्या कालावधीत केलेली विकासकामे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काही भागात उद्याने, उत्तम पद्धतीच्या विविध मुलभूत सुविधा देण्याचे काम केले. मात्र मतदारसंघातील विकासकामांच्या वेगाला गेल्या पाच वर्षांत ब्रेक लागला आहे. हा ब्रेक कायमचा काढून टाकून विकासकामांना पुन्हा वेग देण्यासाठी कपबशी या चिन्हावर मतदान करून सुरक्षित मतदारसंघ बनविण्यासाठी जनतेनेच पुढे यावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

ठिकठिकाणी नागरिकांनीही विलास लांडे यांच्याशी संवाद साधत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. महिलांनी ठिकठिकाणी लांडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लांडे यांच्या पदयात्रेतही सहभाग नोंदविला. या पदयात्रेत नगरसेविका मंदा आल्हाट, हरिभाऊ सस्ते, विठ्ठल कामठे, गजानन गायकवाड, उत्तम आल्हाट, गणेश कुदळे, पप्पू बनकर, अनिल कुदळे, प्रवीण कुदळे, गणेश सस्ते, हिरामण सस्ते, नितीन सस्ते, प्रकाश आल्हाट, रामदास गायकवाड, अनिल आल्हाट, संतोष ढोकले, माणिक आल्हाट तसेच मोशी आणि डुडुळगावाचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleसुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे
Next articleएक संधी द्या, मावळचं सोनं करून दाखवतो – सुनिल शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + 15 =