तळेगाव, दि. 11 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागायला आलो आहे. ही निवडणूक माझ्या एकट्याची नाही तर मावळ तालुक्यातील प्रत्येकाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, आपण सगळे जिवाभावाची माणसे आहोत, हा मावळ तालुका म्हणजे माझा समाज आणि माझे कुटुंब आहे. फ़क्त एक संधी द्या, अहोरात्र परिश्रम करून, विकासकामे करून मावळचं सोनं करून दाखवेन, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे मतदारसंघाचे उमेदवार सुनिल शेळके यांनी केले.
शुक्रवारी सकाळपासूनच सुनिल अण्णांचा मावळातील वराळे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, इंदोरी, जांबवडे, सुदवडी, सुदुंबरे या गावात प्रचार दौरा झाला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सुनील अण्णांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिले. कैंटोमेन्ट बोर्डचे उपाध्यक्ष काशीनाथ दाभाडे, सुभाष तरुण मंडळाचे अधक्ष गुलाब दाभाडे, सतीश दाभाडे, गंगाराम दाभाडे, सुहास दाभाडे, गणेश दाभाडे, संतोष दाभाडे, सुनील दाभाडे, कल्पना दाभाडे, संजय दाभाडे, सागर दाभाडे, भूषण दाभाडे, रितेश दाभाडे, रोहन दाभाडे, अक्षय दाभाडे, रोहित दाभाडे, दादा दाभाडे, मिनल दाभाडे, वैशाली दाभाडे, संध्या दाभाडे, नीरज दाभाडे, सुदर्शन दाभाडे, अनुराग दाभाडे, आशीष दाभाडे, पूनम माळी, गोरख दाभाडे, आदी उपस्थित होते.
गावागावात राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे लागले होते. ‘शेर दिल आमचा नेता’ या डिजेच्या गाण्यावर सुनिल शेळकेंचे तरुण वर्गाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतशबाजी, रांगोळीचा सडा, ढोल-ताशांचा दणदणाट यामुळे चैतन्य निर्माण झाले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ‘एकच नाव- सुनील अण्णा गावात’ हे झेंडे लावून संपूर्ण गाव राष्ट्रवादीमय झाले. कोटेश्वरवाडी येथे उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे म्हणाले की, २५ वर्षात फक्त आमदार बदलत राहिले, तालुका तसाच राहिला. विकास खुंटला आहे. सरकारच्या निरुपयोगी धोरणामुळे मोठे उद्योग तालुक्यातून गेले. तरुणांच्या हाताला काम नाही. महिलांना रोजगार नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला अनुभवी आणि सुशिक्षित उमेदवार लाभला आहे. यंदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तालुक्यातही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे सुनिल अण्णा निवडून येणारच.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला मावळ शहराध्यक्षा रुपाली दाभाडे म्हणाल्या की मावळ तालुक्यात विकासकामांची फक्त उद्घाटने झाली. १४०० कोटी रुपयांचा आमदार निधी कुठे गेला? मतदारांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या लोकांना पुन्हा संधी देऊ नका. विकासाचा महामेरू असलेल्या सुनील अण्णांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन दाभाडे यांनी केले.
इंदोरी गावातही शेळके यांच्या पदयात्रेदरम्यान फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच प्रशांत भगवत माजी सभापती विठ्ठल शिंदे, दिनेश चव्हाण, अंकुश ढोरे, दिलीप ढोरे, बबन ढोरे, रामचंद्र ढोरे, जयंत राऊत, फिरोज काजी, उपसरपंच विक्रम पवार, ग्रामपंचायत इंदोरी, सदस्य बाळासाहेब पानसरे, माजी सरपंच प्रदीप काशिद आदी उपस्थित होते. इंदोरीतील मुस्लिम बांधवांनीही अण्णांचे जोरदार स्वागत केले आणि आपला पाठिंबा दिला.