Home पिंपरी-चिंचवड मोशी, डुडुळगाव भागातील तरूणाईची सेल्फी,विलास लांडे; कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन

मोशी, डुडुळगाव भागातील तरूणाईची सेल्फी,विलास लांडे; कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन

99
0


भोसरी ,दि 11 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भोसरी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित हातात नाही. तरूणांना योग्य दिशा दाखविली जात नाही. त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होईल, असेच वातावरण तयार केले गेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचा विश्वास मोशी आणि डुडुळगाव भागातील तरूणाईने शुक्रवारी (दि. ११) व्यक्त केला. तसेच या भागात प्रचारासाठी आलेले अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यासोबत सेल्फी काढून तरूण-तरूणींनी निवडणुकीत कपबशी या चिन्हावरच मतदानाचे आवाहन सर्वांना केले. चांगल्या आणि उज्वल भविष्यासाठी, शाळा व महाविद्यालये भयमुक्तीसाठी आणि भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी साथ देण्याचे आवाहन विलास लांडे यांनी तरूणाईला केले.

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी शुक्रवारी मोशी तसेच डुडुळगाव भागात प्रचार दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याला तेथील तरूणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या भागातील तरूण-तरूणींनी लांडे यांचे जागोजागी उत्साहात स्वागत केले. अनेकांनी विलास लांडे यांच्यासोबत सेल्फी काढून त्यांना पाठिंबा जाहीर केला. पाच वर्षापूर्वी भोसरी मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हातात गेला. हा मतदारसंघ आता सुरक्षित हातात नाही. सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुंडगिरी वाढली आहे. विद्यार्थीनी शाळा-महाविद्यालयांत सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीत. अनेक गुंड प्रवृत्ती मुलींचा सतत पाठलाग करत असतात. अशा प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे, हे संपूर्ण मतदारसंघ जाणून आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता सुरक्षित करायचा असेल तर बदल करण्याची हीच वेळ आहे. निवडणुकीत कपबशीला मतदान करून हा बदल आम्हीच घडवून आणणार असल्याचा निर्धार या भागातील तरूणाईने व्यक्त केला.

तरूणाईकडून मिळालेला हा प्रतिसाद पाहून अपक्ष उमेदवा विलास लांडे भारावून गेले. आजची तरूणाई समंजस आणि आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याची चांगली जाण असणारी आहे. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक लगेच समजते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचा काळ कसा होता, हे तरूणाईला वेगळे सांगण्याची मला आवश्यकता नाही. चांगल्या विचारासाठी तरूण आणि तरूणींनी पुढे यावे. आपल्या सुरक्षित आणि चांगल्या भविष्यासाठी तसेच भयमुक्त शाळा, महाविद्यालये आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी निवडणुकीत कपबशीला मतदान करावे, असे आवाहन विलास लांडे यांनी तरूणाईला केले.

Previous articleवाकडमधील पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा
Next articleसुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − seven =