Home ताज्या बातम्या कस्पटे वस्ती येथील केटरींग काम करणार्‍या महिलांशी धक्काबुक्की करत दमदाटी

कस्पटे वस्ती येथील केटरींग काम करणार्‍या महिलांशी धक्काबुक्की करत दमदाटी

56
0

वाकड,दि.२९ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-गृह उद्योगातुन कस्पटे वस्ती येथे काही महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केटरींगचा व्यवसाय सुरू केला होता,वाकड येथील काही गाववाल्यांनी त्यांच्या व्यवसाय वरती घात करत तेथील महिलांशी केलं अश्लील वर्तन व धक्काबुक्की करत,येथे व्यवसाय करून देणार नाही,येथे व्यवसाय करायचा नाही इथे तुमचा काहीही संबंध नाही असे बोलत महिलांना लज्जा निर्माण होईल अशी वर्तणूक करत त्यांना अंगावरती साप सोडण्याची भीती दाखवत त्यांना तेथून धुडकावून लावले व त्यांनी केलेल्या तात्पुरत्या राहण्याची सोय म्हणून तेथे तात्पुरता कंटेनर स्वरूपाचे घर केले होते व त्यात राहात त्यांनी महिलांनी व्यवसाय सुरू केला सदर गाव वाल्यांनी कलाटे बंधू यांनी त्यांच्या वडिलोपार्जित मंडळींनी महिलांवर जागा आमचे आहे या जागेवर तुमच्या काही संबंध नाही असं बोलत या महिलांची धक्काबुक्की करत त्यांना असभ्य वागणूक दिली व वाकड पोलीस स्टेशन मध्ये गेले असता पोलिसांनी ही त्यांची तक्रार न घेतल्यामुळे या महिलांनी पोलिस आयुक्तांकडे धाव घेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई याकडे घडलेली सर्व घटना सांगत व अर्ज स्वरूपात दिली व जर या कलाटे बंधू विशाल व संतोष व त्यांचे साथीदार यांच्यावर कारवाई न झाल्यास महिलांना न्याय न मिळाल्यास आयुक्तालय समोर उपोषणाचा दिला इशारा सदरील महिला ह्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून केटरिंगचा व्यवसाय करत आहेत.

Previous articleप्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का? प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा सवाल
Next articleपिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा संधी;उमेदवारी जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − sixteen =