Home ताज्या बातम्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा संधी;उमेदवारी...

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा संधी;उमेदवारी जाहीर

50
0

पिंपरी,दि.२९ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर विश्वास दाखवित पक्षाने पुन्हा एकदा त्यांना आज उमेदवारी जाहीर केली.
आज मातोश्री येथे शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मचे वाटप केले. गेले काही दिवस पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते. तसेच २०१४ साली येथून भाजपने आरपीआयला जागा सोडलेली होती. या पार्श्वभूमीवर आरपीआय (आठवले गट) ने ही पिंपरीच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. तसेच शिवसेनेचे एक विद्यमान नगरसेवक व युवा सेनेचे एक पदाधिकारी देखील पिंपरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते.
अखेर आज उद्धव ठाकरे यांनी, आमदार चाबुकस्वार यांना एबी फॉर्म हातात देत ‘पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडूण या’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

Previous articleकस्पटे वस्ती येथील केटरींग काम करणार्‍या महिलांशी धक्काबुक्की करत दमदाटी
Next articleमित्र पक्षांचा सन्मान करत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करण्याचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + 9 =