Home ताज्या बातम्या भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना देहुरोड पोलिसांनी केली अटक

भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना देहुरोड पोलिसांनी केली अटक

113
0

देहूरोड (१७ जुन २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक,देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्डचे मा.उपाध्यक्ष देहुरोड शहरातील नामांकीत व्यापारी जिंक्की उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन तरुणांना केली अटक,हल्या नंतर सर्व पक्षीय काढला होता मोर्चा त्यामुळे देहुरोड पोलिसांसमोर होते अहवान,राञ दिवस देहुरोड पोलिस स्टेशनचे पथक होते मागावर अरोपी निष्पण करत ठावठिकाणा काढुन केली अटक,
आरोपीच्या भाऊ आणि मित्रावर दाखल झालेल्या जुन्या गुन्ह्यात विशाल खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद केली होती त्याच रागातून हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत आले समोर, गुरुवार (दिं.13 जून, 2019) रोजी विशाल खंडेलवाल यांच्यावर झाला होता गोळीबार.(१७जुन २०१९) आज देहूरोड पोलिसांन कडून दोघांना अटक करण्यात आली,

साबीर समीर शेख (वय 19, रा. तळेगाव स्टेशन),
साईतेजा उर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहूरोड)

अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच् हल्यात फायरींग साठी वापरलेले पिस्टल ही घेतले ताब्यात ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परीमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,गुन्हे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, देहुरोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले,पोलीस काॅ. संकेत घारे, पोलिस .हवा.प्रमोद सात्रस,पोलिस काॅ. नारायण तेलंग यांनी केली असुन पुढिल तपास देहुरोड पोलिस करीत आहे.

Previous articleपुणे महापालिकेच्या धोरणानुसार पिं. चिं महापालिकेने ही मॉल, मल्टिप्लेक्स ला मोफत पार्किंग निःशुल्क करावी
Next articleविद्यार्थ्यानी केला मुख्यध्यापिका यांचा वाढदिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 2 =