वर्धा( दि.४ जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)-
भारतीय संविधानच्या कलम 48(क) नुसार निसर्गाच्या संरक्षणाची पूर्णता जबाबदारी राज्य शासनाची आहे परंतु वर्धा जिल्ह्यात मात्र स्वनिक साधनाची कडून सदर नियमाचे सरास उलघंन चालू आहे कारण ,वर्धा जिल्हा मध्ये होत असलेल्या अवैध रेती व्यवसाय वाहतुक व उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे व मा उच्च न्यायालय नागपूर यांनी वर्धा जिल्ह्यात रेती उपसा ,वाहतूक इ वर पूर्णता बंदी आणली असताना सुद्धा सदर स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाणे अवैध रेती उपसा सम्पून वर्धा जिल्ह्यात चालू आहे
वैध रेती माफिया विरुद्ध अनेक निवेदन उप जिल्हा अधिकारी व खनकर्मी अधिकारी यांना वारंवार देउन अधिकार्यानी रेती माफिया वर कायद्यानुसार कुठल्याही बधनात्मक कार्यवाही केली नाही वर्धा जिल्हात रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या मुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला त्यात 7 ते 9 वर्षीय लहान चिमुकल्या पण समावेश आहे मात्र त्यावर होणारी कार्यवाही मात्र देखावा आहे ,त्यांमुळे आम्ही स्थानिक प्रशासनाच्या विरोधात उपोषणास बसलो अहोत असे उपोषण कर्त्यानी सांगितले.
जिल्हा अधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले,जर कार्यवाही नाही झाल्यास मोठ्या प्रमाणात अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के ,प्रशिल पाणबुडे ,सिद्धांत पाटील ,आकाश पाझारे ,ऍड कपीलरुक्ष गोडघाटे , *दीक्षित सोनटक्के ,बंटी रंगारी ,मयूर भाऊ डफडे पाटील ,सुरज भानसे ,आशिष थुल ,सौरभ सोनटक्के आदी पधाधिकारी उपस्थित होते
उपोषण कर्त्याच्या मागण्या
1) वर्धा जिल्ह्यातील अवैध रेती माफिया वर कार्यवाही करून भविष्यात त्याना कुठल्याही रेतीघट घेण्यासाठीची पात्रता समाप्त करण्यात यावी
2)रेती उपसा अवैध रित्या व नियमांचे उल्लंघन करून याच्या jcp च्या माध्यमातून होत असल्याने वाळू घाटात मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्या मुळे रेती घाट जवळील गावांना दूषित पाणी येत आहे व सदर खड्या मुळे भविष्यात तिथे पाणी पायाला जाणारे जनावरे व लोक सुध्दा खड्यात पडून मुत्यु मुखी पडू शकतात म्हणून त्याच्या वर बदी आणण्यात यावी
3)वर्धा जिल्ह्यात पाणी टंचाई असून सुद्धा रेती उपसा विक्री व वाहतूक बिना रॅयल्टी होत असून शासनाचा महसूल बुडत असल्याने अशा रेती व्यवसाय वाहतूक साठवून करनेवर कोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे
4)वाघोली येथे रेतीच्या गाडीखाली येऊन 9 वर्षाच्या मुलीचा मुत्यु झाला व 23 लोक गंभीर जखमी झालेत त्यामुळे मृत्यू4 झालेल्या मुलीच्या परिजनांना प्रशासनाने 25 लाख व जखमी लोकांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत घ्यावी
5)छोटी वणी येथे रेतीच्या ट्रक खाली येऊन मुत्यु झालेल्या 7 वर्षीय बालकाच्या नातेवाईक 25 लाख आर्थिक मदत घ्यावी
6) वर्धा जिल्ह्यात रेती घटच्या लिलावमध्ये अनियमितताझाली असल्याने व नियमांचे उल्लंघन करून रेतिघाट वाटप करण्यात आल्याने सदर लोलवाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी
7) वाघोली येथे 9 वर्षे मुलीचा मुत्यु व 23 लोक रेतीच्या तर्क5 खाली येऊन जखमी झालेला यास स्थानिक तहसीलदार व खनिकर्मी अधिकारी यांच्या दुलक्षतेमुळे सदर घटना घेतली त्या मुळे त्याच्यावर सुद्धा मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
8) वर्धा जिल्ह्यात मा उच्च न्यायालय नागपूर यांनी रेती उपसा ,वाहतूक ,इ पुर्तना बंदी आणली असताना सुद्धा वर्धा जिल्ह्यातील अवैध रेती उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे व त्यामुळे मा उच्च न्यायालय याच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे त्या मुळे स्थानिक खनकर्मी अधिकारी व तहसीलदार याच्या वर मा .उच्च न्यायालय याच्या आदेशाचे अवमान केल्या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी