Home ताज्या बातम्या धक्कादायक ! विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर गनमधून ‘फायर’, नाचवल्या नंग्या...

धक्कादायक ! विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर गनमधून ‘फायर’, नाचवल्या नंग्या तलवारी

0

क्राईम न्यूज रिपोर्टर

पिंपरी : प्रतिनिधी

निगडी : – पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एयर गणचे ट्रिगर दाबून आवाज केले. तसेच विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते बाराच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला.

या प्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे. तर शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर व इतर 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी निगडी परिसरात विना परवाना शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हातामध्ये एयर गण होत्या. या एयर गणचे ट्रिगर दाबून मोठा आवाज केला जात होता. तर काही मुलींच्या हातात तलवारी होत्या, त्या तलवारीही बंदी असताना मिरवण्यात आल्या. यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.

Previous articleसंभाजी बारणे यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Next articleमा उच्च न्यायालय यांच्या आदेशाची पायमल्ली अवैध वाळु उपसा व वाहतुक चालुच- अशिष सोनटक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =